चंद्रपूर - जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील मेटेपार येथे सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळाल्याची घटना घडली. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तूंची जळून राख रांगोळी झाली. मात्र, आगीने पेट घेताच सर्व कुटुंबिय घराबाहेर पडले. यामुळे जीवितहानी टळली.
नेहमीप्रमाणे दुपारचा चहा बनविण्याकरता दशरथ वाघ यांच्या पत्नीने गॅस सुरू केली असता, अचानक गॅसने पेट घेतला. त्या घाबरून लगेच ओरडत बाहेर निघाल्या व सगळ्यांना घराबाहेर पडण्याचे सांगितले. यावेळी सर्व वेळेवर घरातून बाहेर पडले आणि तेवढ्यात सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरातील सर्व सभासद वेळेत घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात गोंधळ उडाला, व सगळ घटनास्थळाकडे पोहचले.
ग्रामस्थांनी मिळेल आगील आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न सुरू केले. काही वेळात अग्निशामक दलाची गाडी पोहचली आणि आग आटोक्यात आली. मात्र, या स्फोटामध्ये संपूर्ण घराची राखरांगोळी झाल्यामुळे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. ऐन पावसाळ्याच्या मौसमात उद्भवलेल्या या परिस्थीतीमुळे डोक्यावरील छत व जिवनावश्यक वस्तू जळल्याने वाघ कुटुंबियांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.