ETV Bharat / state

चंद्रपुरात पहिल्यांदाच हिमालयन गिधाडाची नोंद, माना टेकडीजवळ झाले कॅमेऱ्यात कैद - गिधाड

चंद्रपुरच्या माना टेकडी परिसरात खुली कोळसा खदान भागात वन्यजीव प्रेमी पराग लांडे यांना एक मोठा पक्षी उडताना आढळला. हा पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे पक्षीप्रेमींमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

chandrapur
हिमालयन गिधाड
author img

By

Published : Jan 7, 2020, 9:21 AM IST

चंद्रपूर - पहिल्यांदाच चंद्रपूर येथील लालपेठच्या माना टेकडी भागात दुर्मिळ समजले जाणारे हिमालयन गिधाड आढळून आले आहे. यामुळे पक्षीमित्रांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रपूरच्या माना टेकडी परिसरात खुली कोळसा खदान भागात वन्यजीव प्रेमी पराग लांडे यांना एक मोठा पक्षी उडताना आढळला. त्यांनी लगेच त्या पक्ष्याला कॅमेऱ्यात कैद केले. त्यांनी अधिक माहितीसाठी या पक्षाचा फोटो वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना पाठवला आणि तो पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. तर, चंद्रपुरात हिमालयन गिधाड हे पहिल्यांदाच दिसल्याचे त्यांनी सांगितले.

हिमालयन गिधाड हे गुजरात, महाराष्ट्र वगळता दक्षिण भारतातल्या केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात आढळून आले. १० वर्षाआधी गिधाड पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. 'डिक्लोफिनॅक' नामक औषधी वेदनानाशक म्हणून जनावरांना दिली जात होती. ही जनावरे मेल्यावर गिधाडांचा आहार बनत असे. परिणामी 'डिक्लोफिनॅक' ह्या औषधीमुळे गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली व त्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आली. बऱ्याच ठिकाणी गिधाड दिसेनाशी झाली होती, नंतर सरकारने 'डिक्लोफिनॅक' औषधावर बंदी आणली. तर, आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघाच्या यादीत हिमालयन गिधाड प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

चंद्रपूर येथे हिमालयन गिधाड दिसल्यामुळे पुन्हा गिधाडांची प्रजाती तग धरत असल्याचे दिसून येते. यामुळे पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरी, पक्षी मित्रांनी व वनविभागाने गिधाड प्रजातीबद्दलची जागरूकता लोकांमध्ये करणे गरजेचे आहे.

चंद्रपूर येथील माना टेकडी परिसरात पक्षीमित्र करण तोगट्टीवार, शशांक मोहरकर, ओंकार मत्ते, रोहित बेलसरे दिनेश खाटे व विक्रांत जठार यांचा या पक्ष्यावर अभ्यास सुरू आहे. ते या माध्यमातून हिमालयन गिधाड पक्ष्याचे वास्तव्य चंद्रपूर परिसरात आणखी कुठे-कुठे आहे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा - बोगस बियाणामुळे चंद्रपूरमधील भातपीक उत्पादक शेतकरी अडचणीत

हिमालयन गिधाडाची ओळख

हिमालयन गिधाड हा प्रामुख्याने हिमालयात आढळतो. हे गिधाड दिसायला मोठे असून हिमालयातील वजनाने जास्त असलेल्या पक्ष्यांमधील एक असून त्याचे वजन ६ ते १२ किलोपर्यंतचे असल्याची नोंद आहे. तर, त्याच्या पंखांची रुंदी ८ ते १० फूट असे. त्यांचे खाद्य मेलेले जनावरे असतात आणि प्रजनन काळ हा जानेवारीमध्ये असतो. त्याचे पंख खरबडीत अणुकुचीदार टोकासारखे असतात. पूर्ण वाढ झालेल्या हिमालयन गिधाडांचे डोके पिवळ्या रंगाच्या पंखाने पांघरलेले असतात. तर, पूर्ण वाढ न झालेल्याचे पांढऱ्या रंगाचे असतात. खालच्या बाजूचे पंख भुरकट तपकिरी तर काहींचे पूर्ण पांढरे असतात. पाय हे नरम कापसासारख्या पिसांनी भरलेले असते तर, पंजे राखाडी किंवा पांढरे असतात. वरच्या पंखावरती रेषा नसतात, तर शेपटीवरचे भूरकट तपकिरी असतात. तर, पंखाच्या टोकाचे पिसे हे गडद तपकिरी रंगाची असतात.

हेही वाचा - लिपिकावर हल्ला करून 'तो' स्वतःच झाला पोलीस ठाण्यात हजर

Intro:
चंद्रपूर : पहिल्यांदाच चंद्रपूर येथील लालपेठ येथील माना टेकडी भागात दुर्मिळ समजले जाणारे हिमालयन गिधाड आढळले.
चंद्रपूर येथील माना टेकडी ह्या परिसरात खुली कोळसा खदान भागात मध्ये वन्यजीव प्रेमी पराग लांडे यांना एक मोठा पक्षी उडतांना आढळला, त्यांनी लगेच त्या पक्ष्याचा कॅमेरा मध्ये त्याचा फोटो घेतला, त्यांना असे लक्षात आले कि हा गिधाड पक्षी असावा, लगेच त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना तो फोटो पाठवला व तो पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले.
चंद्रपूर येथे हिमालयन गिधाड हा पहिल्यांदाच दिसल्याचे त्यांनी सांगितले,
हिमालय गिधाड हे गुजरात व महाराष्ट्र सोडून दक्षिण भारतातल्या केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यात मध्ये आढळून आले. मागील १० वर्ष अगोदर गिधाड पक्ष्याची प्रजाती डिक्लोफिनॅक हि औषधी वेदनानाशक म्हणून जनावरांना दिली जात होती, आणि ती जनावरे मेल्या वर गिधाडे खात असे, त्यामुळे डिक्लोफिनॅक ह्या औषधी मुळे गिधाडांचे आतड्या कडक होऊन मृत पावत असत, त्या मुळे गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली व परिणामी गिधाडांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती,बरेच ठिकाणी गिधाड दिसेनासे झाले होते, नंतर सरकारने डिक्लोफिनॅक औषधी वर बंदी आणली. आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघाच्या यादीत हिमालयन गिधाड प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर येथे हिमालय गिधाड दिसल्यामुळे पुन्हा गिधाडांची प्रजाती तग धरत असल्याचे दिसून येते, पक्षीमित्रानं मध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे तरी पक्षी मित्रांनी व वनविभागाने गिधाड प्रजाती बद्दल ची जागरूकता लोकांमध्ये करणे गरजेचे आहे.
चंद्रपूर येथील माना टेकडी परिसरात पक्षी मित्र करण तोगट्टीवार, शशांक मोहरकर, ओंकार मत्ते, रोहित बेलसरे दिनेश खाटे व विक्रांत जठार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत आहे व आणखी हिमालय गिधाड पक्ष्याचे वास्तव्य चंद्रपूर परिसरात कुठे कुठे आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

हिमालयन गिधाडाची ओळख
हिमालयन गिधाड हा प्रामुख्याने हिमालयात आढळतो, हे गिधाड दिसायला मोठे असून हिमालयातील वजनाने जास्त असलेल्या पक्ष्यांमधील एक आहे,६ किलो ते १२ किलोची नोंद आहे , तर पंखांची रुंदी ८ ते १० फूट असतात , त्यांचे खाद्य हे मेलेलं जनावरांचं असतात ,प्रजनन काळ हा जानेवारी मध्ये असतो , त्याचे पंख खरबडीत अणुकुचीदार टोकासारखे असतात , पूर्ण वाढ झालेल्या हिमालयन गिधाडांचे डोके पिवळ्या रंगाच्या पंखाने पांघरलेले असता तर पूर्ण वाढ न झालेल्याचे पांढऱ्या रंगाचे असतात, खालच्या बाजूचे पंख भुरकट तपकिरी तर काहींचे पूर्ण पांढरे असतात,पाय हे नरम कापसासारख्या पिसांनी भरलेले असते तर पंजे राखाडी किंवा पांढरे असतात, वरच्या पंखांवरती रेषा नसतात, तर शेपटीवरचे भुरकट तपकिरी असतात, पंखाच्या टोकाचे पिसे हे गडद तपकिरी असतात.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.