चंद्रपूर: एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला आहे. पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे तिने मुली आणि नातेवाईकांच्या गळी उतरविले. मात्र, 3 महिन्यांनतर मुलीच्या हाती आई आणि तिच्या प्रियकराचे भ्रमध्वनीतील संभाषण हाती आले आहे. त्यावेळी मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने प्रियकराच्या सल्लाने वडिलांचा खून केल्याचे त्या दोघांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
हृदयविकाराच्या झटका आल्याचे सांगितले: ब्रह्मपुरीतील शाम रामटेके (वय ६६) यांचे 6 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले आहे. त्याचदिवशी पत्नी रंजना रामटेके (वय ५०) हिने तिच्या नागपूर येथे राहणाऱ्या मुली श्वेता (वय २५) आणि योगेश्री (वय २३) मुलींना पतीच्या निधनाची बातमी दिली. Brahmapuri Police दोन्ही मुली दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीत पोहचल्या. त्याचदिवशी अंत्यसंस्कार झाले आहे. वडिलांना हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन झाले, असे आईने दोन्ही मुली आणि नातेवाईकांना सांगितले आहे. त्यांची खात्री पटली.
आईच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण: मात्र सात ते आठ दिवसातच आईची वागणूक बदलली. रंजना यांचे आंबेडकर चौक ब्रह्मपुरी येथे एक छोटेस दुकान आहे. दुकानाच्या समोरच मुकशे त्रिवेदी (वय ४५) यांचा भाजीपाला विक्री आणि बांगड्याचे दुकान आहे. वडिल हयात असतानाच मुकेश हा रंजनाकडे घरी यायचा. निधनानंतर तो आईला न्यायला आणि सोडायला यायचा. मुलींना आईच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. त्यामुळे त्या दोघींनीही ब्रह्मपुरी सोडले आणि नागपूर गाठले.
ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार दाखल: दरम्यान वडिलांच्या निधनापूर्वीच योगेश्रीने आपला भ्रमणध्वनी आईला वापरायला दिला होता. तो तिने परत घेतला. त्यात आई आणि तिच्या प्रियकराचे संभाषण होते. त्यात वडिलांच्या निधनाच्या रात्रीचे संभाषण होते. औषध दिले आहे. आता उशी ठेवून गळा आवळला, असे रंजना ही मुकेशला सांगत होती. चादर व्यवस्थित करुन ठेव. शेजारी आणि नातेवाईकांना ह्रदयविकाराच्या धक्क्याने पतीचे निधन झाले, असे सांगण्याचा सल्ला त्रिवेदी या संभाषणात रंजनाला देत आहे.
वडिलांचा खूनच झाल्याची खात्री: त्यामुळे या दोन्ही बहिणाला वडिलांचा खूनच झाल्याची खात्री पटली. दोन दिवसांपूर्वी श्वेताने ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी रंजना आणि त्रिवेदीला अटक केली. दोघांचीही पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.