ETV Bharat / state

पुढील लाटेसाठी अधिकचे ऑक्सिजन बेड निर्माण करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत निर्देश - राजेश टोपे चंद्रपूर ऑक्सिजन बेड सुचना बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

Corona Meeting
चंद्रपूर कोरोना बैठक
author img

By

Published : Mar 29, 2021, 8:01 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी सध्या ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी आहे. मात्र, भविष्यात दररोजची कोरोना रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे जिल्ह्यात अधिकचे ऑक्सिजन बेड निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक तालुका स्तरावरदेखील 20 ते 25 ऑक्सिजन बेड तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल(रविवारी) रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार सुधीर मुनगुंटीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

गरज पडल्यास खासगी प्रयोगशाळांची मदत घ्या -

शासनस्तरावरून आरोग्यसेवेतील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी रिक्त पदांचा अडसर येऊ नये म्हणून शासकीय रूग्णालयाने 24 तास सेवा देणाऱ्या टेली-आयसीयुचा पर्याय स्वीकारण्याचे तसेच खाजगी डॉक्टरांचे मानधन ठरवून आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याही सेवा घेण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कोरोना आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळालाच पाहिजे. यासाठी आवश्यकता पडल्यास खासगी प्रयोगशाळेची मदत घेण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.

नागरिक मोठ्या विश्वासाने आपल्याकडे येतात -

नागरिक मोठ्या विश्वासाने शासकीय रूग्णलयात येतात. त्यामुळे शासकीय रूग्णालय, सर्व कोविड केअर सेंटर व संस्थात्मक विलगीकरण कक्षात साफसफाई, उत्तम जेवणाची सोय व प्रसाधन गृहाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. रुग्णांसाठी उत्तम पद्धतीची व्यवस्था झाली पाहिजे, असे निर्देश टोपेंनी दिले. खासगी रूग्णालये देखील त्यांच्याकडील रूग्णांना शेवटच्या क्षणी शासकीय रूग्णलयाकडे शिफारस करतात. कोरोनाबाधीतांवर वेळीच उपचार व्हावे म्हणून लक्षणे आढळणाऱ्या रूग्णांचे स्वॅब तातडीने तपासणीला पाठवने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण पूर्ण करून घ्या -

सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ज्या रुग्णालयात पुरेशी जागा, डॉक्टर व लस ठेवण्यासाठी कोल्डचेन उपलब्ध आहे, त्या सर्व शासकीय व खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरणाचा वेग दुप्पट करावा. लस कमी पडू दिली जाणार नाही, आपल्या मागणीप्रमाणे लससाठा उपलब्ध करून देण्यात यईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगतले.

यावेळी आमदार सुधीर मुनगुंटीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी योग्य समन्वयाने काम करण्याची गरज तसेच वैद्यकीय सेवेतील रिक्त पदभरती, कंत्राटीसेवकांचे प्रश्न, उन्हाळ्यात लसीकरणाच्या वेळेत बदल, ग्रामीण भागात उपचाराची सोय, जिल्ह्यासाठी वाढीव लस साठा इत्यादी बाबींकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.