ETV Bharat / state

गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकण्यात यावी; राष्ट्रीय ओ.बी.सी युवा महासंघाची मागणी

author img

By

Published : May 28, 2020, 9:28 AM IST

देश व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा १६ जुन पासून होणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर

चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणुचे रुग्ण वाढत आहेत. अशा परीस्थितीमध्ये १६ जून पासून विद्यापीठाची होणारी अंतिम परीक्षा रद्द करून कालावधी दोन ते तीन महिने वाढवावा, अशी मागणी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना करण्यात आली आहे. ही मागणी उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय ओ.बी.सी युवा महासंघाच्या तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. परीक्षा द्यायला विविध राज्य व जिल्ह्यातून विद्यार्थी येणार असल्याने कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही, असे म्हणणे चुकीचे होईल. म्हणून, भीती मुक्त परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. याकरीता गोंडवाना विद्यापीठाची १६ जूनला होऊ घातलेली परीक्षा दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलावी, अशी मागणी चिमूर तालुका राष्ट्रीय ओ.बी.सी युवा महासंघाकडून निवेदनात करण्यात आली आहे.

तहसीलदार संजय नागटिळक यांनी निवेदन स्विकारले आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार , सल्लागार हरीष पीसे , रामदास कामडी , कवडू लोहकरे व अविनाश अगडे इत्यादी उपस्थीत होते .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.