चंद्रपूर- प्रेमी युगल पळून जात असताना शेतात ठेवलेल्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भद्रावती तालुक्यात घडली. युवतीचे नाव कोमल राम गराटे असे आहे.
भद्रावती तालुक्यातील खैरगाव येथील २१ वर्षीय कोमल हिचे निंबाळा गावातील हेमंत दडमल या २५ वर्षीय युवकाशी प्रेम होते. काल रात्री दोघांनीही पळून जाण्याचे ठरवले. दोघेही विठ्ठल गेडाम यांच्या शेतातून पळून जात होते. या दरम्यान कोमलचा गेडाम यांच्या शेतातील जिवंत तारांना स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला.