चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील गडचांदूर इथे 67 लाखांच्या दारूवर रोलर फिरवण्यात आला. गडचांदूर पोलिसांनी 67 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ही दारू पकडली होती. यात देशी-विदेशी मद्याचा समावेश आहे.
गावालगत एका निर्जन मार्गावर या जप्त दारूच्या बाटल्या अंथरण्यात आल्या आणि त्यावरून रोलर फिरवला गेला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दारुचे पाट वाहताना दिसले. मागील आठवड्यात अशीच एक कारवाई करत कोट्यवधींची दारू नष्ट करण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र तरीही इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणली जाते. हा व्यवसाय आता संपूर्ण जिल्ह्यात पसरला आहे. पोलीस विभाग वेळोवेळी यावर कारवाई करत असतो.