ETV Bharat / state

चंद्रपुरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 467 वर ; 24 तासांत 20 रुग्णांची वाढ - chandrapur corona update news

सिंदेवाही येथील जयस्वाल कॉलनीतील 48 वर्षीय नागरिकाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घुगुस शहरातील रामनगर परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 48 वर्षीय महिलेचा अँटीजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

chandrapur corona
chandrapur corona
author img

By

Published : Jul 30, 2020, 8:38 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४६७ झाली आहे. २९३ बाधित बरे झाले असून १७४ बाधितावर उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या २० बाधितांमध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर शहर येथील नागरिकांचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या गंभीर आजाराने दाखल करण्यात आलेल्या टेकाडी परिसर मुल येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नागभिड येथील हृदयरोगाने आजारी असणारे 51 वर्षीय व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील 38 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.

सिंदेवाही येथील जयस्वाल कॉलनीतील 48 वर्षीय नागरिकाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घुगुस शहरातील रामनगर परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 48 वर्षीय महिलेचा अँटीजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा दत्त मंदिर येथील आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 4 पुरूष पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे. सावली तालुक्यातील सावली चांडाळी बुज येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय तरुण बाधित ठरला आहे. भद्रावती शहरातील चंडिका वार्ड येथील 25 वर्षीय युवक तेलंगना येथून परत आल्यानंतर तपासणी केली असता पॉझिटिव्ह ठरला आहे. बल्लारपूर येथील रेल्वे कॉलनीतील 44 व 49 वर्षीय नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोनही नागरिक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते.

चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरातील सिंधी कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरला आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी येथे सिक्कीम राज्यातून प्रवास करून आलेला २४ वर्षीय तरूण पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनीमध्ये माता मंदिर परिसरात राहणारे ५० वर्षीय गृहस्थ व १६ वर्षीय तरुणी बाधित ठरली आहे. संपर्कातून हे दोघेही बाधित ठरले आहे. याशिवाय चोर खिडकी परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. तसेच पठाणपुरा वार्ड चंद्रपूर येथील २६ वर्षीय तरुण हा देखील संपर्कातून अँटीजेन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह ठरला आहे.त्यामुळे आज एकूण २० बाधित पुढे आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण संख्या 467 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.