चंद्रपूर - राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी यासंदर्भातली माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कात असलेले दोन सुरक्षारक्षक पंधरा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानाजवळील सात जण कोरोनाबधित असल्याचे आढळून आले होते. यानंतर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना भेटणे बंद केले होते. केवळ फोनच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. यादरम्यान ते मुंबईला विधानसभा अधिवेशनासाठी जाऊन आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली होती. चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले.