ETV Bharat / state

Chandrapur : माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे व खासदार धानोरकर यांचे एकमेकांवर गंभीर आरोप, बघा काय आहे नेमके प्रकरण... - काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे ( Moreshwar Temurde ) यांनी खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar ) यांच्यावर गंभीर आरोप केली. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना पत्र पाठविले आहे. 21 नोव्हेंबर 2022 लिहिलेले पत्र समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली. हे पत्र व्हायरल झाल्यावर खासदार धानोरकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrapur
बाळू धानोरकर
author img

By

Published : Nov 30, 2022, 4:11 PM IST

चंद्रपूर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे आणि काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar ) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करत टीका केली आहे.

माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे व खासदार धानोरकर यांचे एकमेकांवर गंभीर आरोप

टेमुर्डेंचे खासदार धानोरकरांवर आरोप - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप केली. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना पत्र पाठविले आहे. 21 नोव्हेंबर 2022 लिहिलेले पत्र समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धानोरकर यांनी टेमुर्डे यांना फोन करून आपल्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्याकडून आपले नाव सुचवायचे आहे अशी विनंती केली. धानोरकर हे कुणबी समाजाचे असून या क्षेत्रात कुणबी समाज बहुसंख्य असल्याने टेमुर्डे यांनी पवार यांची भेट घेत धानोरकर यांचे नाव सुचवले. यानंतर पवार यांनी थेट राहुल गांधी यांना फोन करून धानोरकर यांचे नाव सूचविले आणि त्यानंतर काँग्रेसकडून बाळू धानोरकरांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. धानोरकर निवडणूक येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पराकोटीचे परिश्रम घेतले. पण जसे धानोरकर निवडून आले तसे त्यांनी माझ्याशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध ठेवले नाहीत. यानंतर त्यांनी केवळ आपले दारूचे दुकाने वाढवली, अवैध धंद्यात जास्त लक्ष घातले. जास्त कमिशन मिळविण्यासाठी समोरच्यांवर दबाव आणला. ते कमालीचे अहंकारी बनले, आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. आपण पुन्हा धानोरकरांना उमेदवारी देऊ नये अन्यथा काँग्रेस पराभूत होईल असे या पत्रात नमूद आहे.

खासदार धानोरकरांची प्रतिक्रिया - हे पत्र व्हायरल झाल्यावर खासदार धानोरकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टेमुर्डे हे राजकीय बेरोजगार व्यक्ती असून त्यांच्या या विधानाची दखल आपण घेत नाही, असे धानोरकर म्हणाले. टेमुर्डे यांचे शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक शिक्षकांना बेरोजगार केले, शासकीय मान्यता मिळेल म्हणून त्यांनी अंधारात ठेवले. प्रत्यक्ष शासकीय मान्यता मिळाली नाही टेंभुर्डे यांच्या मुलाने आपल्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढवली होती मात्र केवळ 4000 मते त्यांना मिळाली होती. टेमुर्डे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पत्नीकडून पैसे घेतले होते, तसेच काही छोट्यामोठ्या निवडणूका आल्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या मोठ्या नेत्यांचा दौरा असला की ते पैसे मागायला येतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार राहुल गांधी आले असताना टेमुर्डे यांना कुठलेही निमंत्रण नसताना ते व्यासपीठावर बसले होते, असेही धानोरकर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.