ETV Bharat / state

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

वनरक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळ कर्मचारी संघटना सदस्यांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत रामबाग येथील व्यवस्थापक कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे.

वनरक्षकाची आत्महत्या
author img

By

Published : Nov 9, 2019, 7:29 PM IST

चंद्रपूर - वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे वनरक्षकाने गळफास लावून आपले जीवन संपवल्याची घटना आज चंद्रपूरमध्ये घडली. गणेश झोंबडे, असे वनरक्षकाचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान त्याला मानसिक त्रास दिला जात होता. म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.

चंद्रपुरात वनरक्षकाची आत्महत्या

हेही वाचा - नागभीड येथील स्मशानभूमी बनली कचरा डम्पींग यार्ड

गणेश झोंबडे हा वनविकास महामंडळ जुनोना येथे कर्तव्यावर होता. एका अनियमिततेच्या प्रकरणात तो गेल्या 17 महिन्यांपासून निलंबित होता. दरम्यान, आज गणेशने आत्महत्या केली. गणेशच्या मृतदेहाजवळ एक चिट्टीही सापडली आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात मुलाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात धडकले

वनरक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळ कर्मचारी संघटना सदस्यांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत रामबाग येथील व्यवस्थापक कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे. वनरक्षकाचा मृतदेह रामबाग येथील वनविकास महामंडळ कार्यालयापुढे ठेवला असून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Intro:चंद्रपूर : वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे अखेर वनरक्षकाने गळफास लावून आपले जीवन संपवल्याची घटना आज चंद्रपूर येथे घडली. वनरक्षकाचे नाव गणेश झोंबडे असून त्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र या दरम्यान त्याला मानसिक त्रास दिला जात होता म्हणून त्याने हे पाऊल उचलल्या जात होते असे बोलल्या जात आहे.

चंद्रपूरात वनविकास महामंडळ वनरक्षकाने शासकीय राहत्या निवासस्थानी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. वनविकास महामंडळ जुनोना येथे तो कर्तव्यावर होता. एक अनियमिततेच्या प्रकरणात हा वनरक्षक गेले 17 महिन्यापासून निलंबित होता. गणेश झोंबाडे याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचामुळे मानसिक तणावात हे पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या सहका-यांनी दिली आहे. याशिवाय आपल्या आत्महत्येमागे असलेल्या कारणांची माहिती देणारी नोट त्याच्या मृतदेहाजवळ सापडली आहे. हे वृत्त कळताच वनविकास महामंडळ कर्मचारी संघटना सदस्यांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत रामबाग येथील व्यवस्थापक कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे. वनरक्षकाचा मृतदेह रामबाग येथील वनविकास महामंडळ कार्यालयापुढे ठेवला असून वरीष्ठ वनाधिका -यांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

बाईट १) सचिन दुर्गेवार, विभागीय अध्यक्ष, कर्मचारी संघटना
बाईट २) जी. के. अनारसे, प्रादेशिक व्यवस्थापक, वनविकास महामंडळ ,चंद्रपूरBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.