राजुरा (चंद्रपूर) - तलावातील मासोळ्या चोरून बाजारात विक्री करणे चोरट्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. मासोळ्या चोरणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोरपना तालुक्यात घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कारगाव येथील पकड्डीगुडम तलावात गोविंद मत्स्य सहकारी संस्थेचे मत्स्यपालन सुरू आहे. तलावातील मासोळ्यांची चोरी करून जिवती, वनसडी परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. चोरलेल्या मासोळ्या, जाळे पोत्यात भरून विक्रीला नेत असताना तलावाच्या राखणदाराने चोरट्यांचा पाठलाग केला. त्यावेळी चोरटे सत्तर ते ऐंशी किलो मासोळ्या ठेवून फरार झाले. दरम्यान, संस्थेच्या सचिवांनी मनोज खंगारे, विठ्ठल वाघाडे, विनोद यामलवार या तिघांच्या विरोधात कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनात राठोड पुढील तपास करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये मासोळ्यांची चोरी; गुन्हा दाखल, तीन आरोपी फरार - rajura chandrpur news
कारगाव येथील पकड्डीगुडम तलावात गोविंद मत्स्य सहकारी संस्थेचे मत्स्यपालन सुरू आहे. तलावातील मासोळ्यांची चोरी करून जिवती, वनसडी परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली.