ETV Bharat / state

राजूरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, आत्ता पर्यंत ९ जणांचा बळी - rajura tiger attack news

राजूरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात वाघाच्या हल्यात एक शेतकरी ठार झाला आहे. मारोती पेंदोर असे मृतकाचे नाव आहे. राजूरा तालुक्यात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात नऊ लोकांचा बळी गेला.

Farmer killed in tiger attack in Rajura taluka
राजूरा तालुक्यात वाघाच्या हल्यात शेतकरी ठार
author img

By

Published : Oct 6, 2020, 10:13 AM IST

चंद्रपूर (राजूरा)- राजूरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाला आहे. मारोती पेंदोर असे मृतकाचे नाव आहे. राजूरा तालुक्यात आतापर्यंत वाघाच्या हल्यात नऊ लोकांचा बळी गेला. त्यामुळे तालुक्यात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना उघळकीस आल्याने खळबळ उडाली. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र प्रत्येक वेळी वाघ हूलकावणी देत आहे.

राजूरा तालुक्यातील खांबाला येथिल शेतकरी मारोती पेंदोर यांचे शेत जंगलालगत आहे. 5 आक्टोंबरला पेंदोर शेतात गेले होते. परंतू रात्र झाली तरी पेंदोर घरी परतले नाही. त्यामुळे कुटूंबिय चिंतेत होते. आज जंगलात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहीती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. राजूरा तालुक्यात वाघाने घेतलेला हा नववा बळी आहे. सतत होणाऱ्या हल्यामुळे तालुक्यात दहशत पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.