ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ताडोबा परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत

कोलरा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मृत झाल्याची घटना घडली. बालाजी वाघमारे(वय-६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मृत बालाजी वाघमारे शुक्रवारी रात्री शेतात राखण करण्यासाठी गेले होते.

Farmer Dead
शेतकरी ठार
author img

By

Published : Feb 15, 2020, 8:15 PM IST

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलरा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मृत झाल्याची घटना घडली. बालाजी वाघमारे(वय-६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी वाघमारे हे शुक्रवारी रात्री शेतामध्ये राखण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाघाने हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

मृत बालाजी वाघमारे शुक्रवारी रात्री शेतात राखण करण्यासाठी गेले होते. शनिवारी ते परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शेतात जाऊन शोध घेतला. तेव्हा शेताजवळील झुडपात बालाजी यांचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांना घटना स्थळी गर्दी केली होती.

हेही वाचा - हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वन विभाग आणि चिमूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.