चंद्रपूर - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील अंतरगाव अन्नूर येथे घडली आहे. विलास उद्धव चौधरी ( वय अंदाजे 45 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार; मुलगा गंभीर
राजूरा तालूक्यातील अन्नूर अंतरगाव येथिल विलास उध्दव चौधरी यांच्याकडे मौजा अन्नूर येथे शेतजमीन आहे. काही दिवसांपासुन होत असलेली सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते चिंताग्रस्त होते. दरम्यान, सोमवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी विष पिले. त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रात्री 11.00 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत विलास चौधरी यांच्या पश्चात चार मुले, पत्नी असा परिवार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.