ETV Bharat / state

प्रेयसीने प्रियकराकडे राहण्यास दिला नकार, २० दिवसाच्या संसाराची झाली सांगता - love

मासळ येथील रहिवासी श्रीकांत पाटील आंतरजातीय विवाह केला होता. याविरोधात दुखावलेल्या मुलीच्या घरच्यांनी तिला २५ ऑक्टोबरला बळजबरीने मारझोड करून श्रींकातच्या घरून पळवून नेले होते. त्याविरोधात श्रीकांतने चिमूर पोलीस ठाण्यात तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना तिला पोलीस ठाण्यात हजर करण्यास बजावले. त्यानुसार मुलीच्या घरच्यांनी तिला पोलिसांपुढे हजर केले असता संबंधित मुलीने प्रियकराकडे राहण्यास नकार दिला.

त्या प्रेमी युगलाची 'अधुरी कहानी',
author img

By

Published : Nov 1, 2019, 3:41 PM IST

चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील मासळ येथील रहिवासी श्रीकांत पाटील याने १ ऑक्टोबरला आंतरजातीय विवाह केला. यास विरोध करीत दुखावलेल्या मुलीच्या कुंटुबीयांनी २५ ऑक्टोबरला बळजबरीने मारझोड करून श्रींकातच्या घरून मुलीला पळवून नेले होते. त्याविरोधात श्रीकांतने चिमूर पोलीस ठाण्यात तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात हजर करण्याबाबत तिच्या कुटुंबीयांना बजावले. त्यानुसार मुलीच्या घरच्यांनी तिला पोलिसांपुढे हजर केले. मात्र, यावेळेस संबंधित मुलीने प्रियकराकडे राहण्यास नकार दिला. या प्रकारामुळे श्रीकांतचा हिरमोड झाला असून या प्रेमी युगुलाची कहाणीचा अर्ध्यातच शेवट झाला आहे.

त्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी',

हेही वाचा - पत्नीचे माहेरच्यांकडून अपहरण, पतीची पोलिसात तक्रार

याबाबत माहिती सविस्तर माहितीनुसार, 'श्रीकांतचे १ ऑक्टोबरला बौद्धविधी व विवाह नोंदणीनुसार लग्न झाले. याबाबत ६ ऑक्टोबरला मुलीच्या आई वडीलांनी मुलगी हरविल्याची तक्रार चिमूर पोलिसात केली होती. संबंधित तक्रारीवरून मुलीने ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात हजर होत सगळ्यां समक्ष आपल्या प्रियकर पतीसोबतच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनतर २५ ऑक्टोबरला मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीकांतच्या घरी येऊन मुलीला मारझोड करत बळजबरीने आपल्याबरोबर नेले. याबाबत श्रीकांतने चिमूर पोलीस तथा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार नोंदवत पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती केली होती.

हेही वाचा - जोरगेवारांच्या संभ्रमावर मुख्यमंत्र्यांचे 'डॅमेज कंट्रोल', सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन

त्यानुसार कारवाई करत पोलीस प्रशासनाने मुलीच्या कुटुंबीयांना मुलीस त्वरीत पोलीस ठाण्यात हजर करण्याची ताकीद दिली. सदर मुलगी व तिचे कुटुंबीय हे चिमूर पोलिसात हजर झाले. मात्र, यावेळेस मुलीने पोलिसांसमक्ष श्रीकांतकडे न राहता आई-वडीलांकडेच राहणार असल्याचे बयान दिले. त्याआधारे पोलिसांनी पंचासमोर बयान नोंदवून सदर मुलीस तिच्या आई वडीलांकडे सुपूर्द केले. अशा प्रकारे २० दिवसाच्या या प्रेमकहाणीचा डाव अर्ध्यावरतीच मोडला.

हेही वाचा - निवडणुकीदरम्यान जोरगेवार-भांगडीयांची झाली गुप्त बैठक? राजकीय चर्चेला उधाण

Intro:त्या प्रेमी युगलाची झाली ' अधुरी कहानी '
प्रेयसीने प्रियकराकडे राहण्यास दिला नकार
- विस दिवसाच्या संसाराची झाली सांगता
चिमूर MHC10019
चिमूर तालुक्यातील मासळ येथील श्रीकांत पाटील या तरूणाने आंतरजातीय विवाह केले .यास विरोध करीत दुखावलेल्या मूलीच्या कुंटूबियांनी २५ आक्टोबंरला बळजबरीने मारझोड करून श्रींकातच्या घरून मुलीला पडवुन नेले . .याविरोधात तक्रार चिमूर पोलिस स्टेशन तथा जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात . तक्रारी नुसार मूलीस पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येण्या करीता पोलीसांनी बजावले .त्यानुसार मूलीस पोलींसा पुढे हजर केले असता मूलीने प्रियकराकडे राहण्यास नकार दिला .ज्यामूळे या प्रेमी युगलांची एक अधुरी कहानी ठरली आहे .
.प्रेमाला कोणत्याही प्रकारची जाती , धर्म , पंथ , गरीबी - श्रीमंतीची बंधने नसतात . जाती निर्मुलन होऊन समाजा समाजात , जाती जातीत सलोख्याचे संबध प्रस्तापीत होऊन समानता यावी याकरीता आंतरजातीय विवाहास शासणा कडून प्रोत्साहन देण्यात येते . मात्र जाती धर्माचा पगळा काही केल्या सैल होण्याचे नावच घेत नाही .मासळ येथील युवक श्रिकांत चरणदास पाटील यांचे लग्न १ ऑक्टो ला तिन किलोमीटर अंतरावरील गावातील एका मुलीशी प्रेमसंबधातुन आंतरजातीय विवाह झाले . मुलगी हरवल्याच्या तक्रारी वरूण चिमूर पोलीस स्टेशन मध्ये ६ आक्टोंबरला हजर झाले व सगळ्या समक्ष मुलगी आपल्या प्रियकर पतीसोबतच राहणार असल्याचे सांगीतले होते .
त्यानुसार मासळ ( बु ) येथे दोघेही पती - पत्नीचा संसार सुरू झाला . मात्र २५ ऑक्टोबरला मूलीच्या कुटुंबियानी बळजबरीने मारझोड करीत बळजबरीने नेले .याची तक्रार श्रीकांत ने चिमूर पोलीस तथा पोलीस अधिक्षकांना करुण पत्नी मिळवून देण्याची विनंती केली .पोलीस प्रशासणाने मुलीच्या कुटुंबाना मूलीस त्वरीत हजर करण्याची ताकीद दिली .त्याप्रमाणे मुलीस हजर करण्यात आले . मात्र पोलीसा समक्ष प्रियकरा कडे जाणार नसुन आई वडीलां कडेच राहणार असल्याचे बयान दिले . पोलीसांनी पंचासमक्ष बयान नोंदवुन मुलीस तिच्या आई वडीलांच्या सुपुर्द केले . अशा प्रकारे अवघ्या विस दिवसाच्या संसाराची सांगता झाल्याने प्रियकर हिरमुसला.

Body:पोलीस निरीक्षक , चिमूर - मनोज गभनेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.