चंद्रपूर : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेल्याने इतिहासात पहिल्यांदाच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. विजेची मागणीच नसल्याने संपूर्ण सातही संच बंद करण्यात आले आहे. मागणी वाढली तरच टप्प्याटप्प्यात वीज निर्मिती सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनेक मोठ्या उद्योगधंद्याना टाळे लागले आहे. अशा उद्योगांना उत्पादनासाठी मोठया प्रमाणात वीज लागते. मात्र, आता विजेची मागणीच नाही. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सात संचापैकी केवळ दोन संचातुन वीज निर्मिती केली जात होती. 500 मेगावॉट क्षमता असलेल्या दोन संचातुन 930 मेगावॉट वीजनिर्मिती होत होती. आज संध्याकाळी अचानक विजेची मागणी कमी झाली. ती इतकी कमी होती मे उरलेले दोन्ही संच व्यवस्थपणाला बंद करावे लागले.
या काळात संचांच्या देखभालीची कामे केली जाणार आहे. मागणी वाढताच संच टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागणी नसल्याने वीजनिर्मिती संच बंद करण्याची हे आजवरच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे.