चंद्रपूर - खर्याचे सेवन करणाऱ्यात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगाने अनेकांना आयुष्याचा मध्यतरीच रन आऊट केले. गुटखा, तंबाखूचा पाकिटावर वैज्ञानिक इशारा छापलेला असतो. आता तर चक्क पानटरीवालेच कर्करोगापासून वाचण्यासाठी उपाय घेऊन आले आहेत.
खर्राचे भाव वधारले आहेत. ही सूवर्ण संधी आहे. खर्रा बंद करा अन आजारापासून वाचा, अशा संदेशाचे पत्रक पानटपरीवर वाचायला मिळत आहेत. राज्यात सुगंधीत तंबाखूवर बंदी आहे. ही बंदी नाममात्र असून गावागावात पानटपऱ्यांची संख्या मोठी आहे. सुगंधीत तंबाखू व सुपारी यांच्या मिश्रित खऱ्याचे व्यसन असलेल्यांची संख्या मोठी आहे. आता तर विध्यार्थी आणि महिलाही या व्यसनाचा आहारी जात असल्याचे विदारक चित्र चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
सुगंधी तंबाखूवर बंदी आहे तर दूसरीकडे मागणी मोठी आहे. त्यामुळे तंबाखूचे भाव वधारले आहेत. दहा रुपयाला मिळणारा खर्रा आता तीस रुपयावर गेला. पानटपरीवाल्यांनी भाव वाढ केली. या भाव वाढीचे समर्थन करताना "मौलिक" संदेशही दिला. " सुवर्ण संधी, सुवर्ण संधी ,कॅन्सरने वाचा सूवर्ण संधी" असे लिहीलेले पत्रक चक्क पानटपरीवर दिसू लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्हारशहा, राजूरा तालुक्यातील विविध भागातील पानटपऱ्यांवर ही पत्रके दिसू लागली आहेत. या पत्रकाची चर्चा सध्या भलतीच रंगली.