ETV Bharat / state

गरिब गावकऱ्यांना मेडिकल किटचे वाटप; धाबा पोलिसांचा उपक्रम

author img

By

Published : Apr 7, 2020, 12:35 PM IST

लॉकडाऊनमुळे हिवऱ्यातील किमान 15 वयोवृध्दांच्या कुटुंबियांची अवस्था बिकट झाली. रोजीरोटी अभावी कुटंबातील सदस्याचे पोट भरणे कठीण असताना वयोवृध्दांची हालत खालावत होती. ठाणेदार सुशिल धोपटे यांनी या वयोवृध्दांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचे ठरवले.

medical kit
मेडिकल किटचे वाटप

चंद्रपूर - कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात समाजातून अनेक मदतीचे हात समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गरजूंना अन्नधान्याचे आणि जेवणाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुशिल धोपटे यांनी देखील हिवरा येथील गरीब वयोवृध्दांना विटॅमीन आणि मेडीकल किटचे वितरणाचा उपक्रम राबवला आहे.

हिवरा येथे दोन महिन्यांपूर्वी ठाणेदार सुशिल धोपटे यांनी वयोवृध्द नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेतला होता. यातून त्यांनी वयोवृध्दांना सुरक्षेची आणि मदतीची ग्वाही दिली होती. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. लॉकडाऊनमुळे हिवऱ्यातील किमान 15 वयोवृध्दांच्या कुटुंबियांची अवस्था बिकट झाली. रोजीरोटी अभावी कुटंबातील सदस्याचे पोट भरणे कठीण असताना वयोवृध्दांची हालत खालावत होती. ठाणेदार सुशिल धोपटे यांनी या वयोवृध्दांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचे ठरवले.

यानुसार सोमवारी ठाणेदार धोपटे यांनी साबण, मास्क, प्रोटीन पावडर, मिल्क पावडर, कॅल्शीअमच्या औषधी, मल्टीविटॅमीन अशी मेडीकल साहित्याची किट तयार केली. गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलीस ठाण्याच्यावतीने हिवरा गावात ठाणेदार सुशिल धोपटे आणि सरपंच सुशिला पुलगमकर यांनी कोरोनासंदर्भात जनजागृती केली. गावातील आशा सेविकांना रोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकांच्या घरी भेट देऊन नागरिकांची माहिती घेण्यास सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.