चंद्रपूर - खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरुणाच्या जीवावर बेतले. जबर विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ( Youth Dies due to Electric Current ) पुंडलिक पाथोडे असे या तरुणाने नाव असून ही घटना नागभीड तालुक्यातील बोथली येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. ( Youth Dies Electric Shock Nagbhid Chandrapur )
मुख्य वीज लाईनचा पुरवठा खंडित न करता...
प्राप्त माहितीनुसार, नागभिड तालुक्यातील बोथली येथील तरूण पुंडलिक पाथोडे हा विजेशी सबंधीत कामे करायचा. घटनेच्या दिवशी चिखलपरसोडी येथे एका घरातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा पुर्वरत करण्यासाठी पुंडलिक गेला होता. मुख्य वीज लाईनचा पुरवठा खंडित न करता तो खांबावर चढला. दरम्यान, जिवंत विद्युत तारेच स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का बसला. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. त्याचा देह लोंबकडलेल्या स्थितीत खांबावरच लटकत होता. घटना लक्षात येताच गावकरी धावून आलेत.
महावितरण, पोलीस विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह खांबावरून उतरविण्यात आला.उपचारासाठी पुंडलिकला नागभिड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने बोथली गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान पुढील तपास सुरू आहे.