चंद्रपूर - गोंडपिपरी येथील तलाठी कार्यालयाजवळ असणाऱ्या सार्वजनिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सचिन मस्के, असे मृत तरुणाचे नाव आहे.
गोंडपिपरीतील राम मंदिर परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ सार्वजनिक विहिर आहे. यामध्ये सचिन मस्के (वय-30) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढला असून तपास सुरू आहे.