राजूरा (चंद्रपूर) - कोरपना तालुक्यातील सांगोडा गावाला जवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रालगतच्या शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह शनिवारी (दि. 2 मे) दुपारच्या सुमारास आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा असून अजून त्या महिलेची ओळख पटली नाही.
कोरपना तालूक्यातील सांगोडा गावालगत वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रतात एका वयस्क महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ही महिला पैनगंगा नदी पात्रालगतच्या अंतरगाव, सांगोडा गावात भ्रमंती करताना काही नागरिकांना आढळून आली होती. भूक-तहानेने तिचा प्राण गेल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - चंद्रपूरात आढळला पहिला कोरोना रुग्ण, बंगाली कॅम्प परिसरातील कृष्णानगर सील