ETV Bharat / state

तेलंगणातून चंद्रपूरात परतलेल्या मजूरांचा घरी जाताना जीवघेणा प्रवास - Dangerous journey of laborers coming from Telangana

तेलंगणात अडकलेले मजूर हजारोंचा संख्येने चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर असलेल्या पोडसा येथे मजूरांची जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे.

laborers coming from Telangana to Chandrapur
तेलंगणातून चंद्रपूरात परतलेल्या मजूरांचा घरी जाताना जीवघेणा प्रवास
author img

By

Published : May 3, 2020, 11:55 AM IST

राजूरा (चंद्रपूर) - तेलंगणात अडकलेले मजूर हजारोंचा संख्येने चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर असलेल्या पोडसा येथे मजूरांची जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे. या मजूरांना खासगी वाहनांनी त्यांच्या घरी पोहचवले जात आहे. मात्र, वाहनांचा संख्या कमी असल्याने एका ट्र‌ॅक्टरला दोन ट्रॉली लावून मजूरांना नेले जात आहे. या जूगाडाने मात्र एकाच वेळी अनेक मजूरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तेलंगणातून चंद्रपूरात परतलेल्या मजूरांचा घरी जाताना जीवघेणा प्रवास

हेही वाचा... व्हिडिओ : 'तुमच्या अंगातील मस्ती पाहून मला भयंकर राग येतोय' कोरोनाबाबत चिमुकलीने नागरिकांना खडसावले

लॉकडाऊन देशात कायम असले तरिही परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले हजारो मजूर चंद्रपूर जिल्ह्यात आले. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले.

पोडसा येथे हजारोंचा संख्येने मजूर गोळा झाले आहेत. खासगी वाहनांनी या मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्यात येत आहेत. मात्र, वाहनांची कमरतरता असल्याने एका ट्र‌ॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून या मजूरांना नेले जात आहे. या जूगाडाने एकाच वेळी जास्त संख्येने मजूर प्रवास करत आहे. असे असले तरिही हा प्रवास जिवघेणा ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.