राजुरा (चंद्रपूर) - गोंडपिपरी तालुक्याला परतीचा पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्याला झोडपून काढले. मेघगर्जनेसह बरसलेल्या वादळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले धान पीक जमिनीवर पसरले आहे. धाबा परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. बळीराजाने वन्यजीवांपासून मोठ्या प्रयत्नांतून वाचविलेली पिकांचे निसर्गाने मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील धान, कापूस, सोयाबीन आणि मिरची पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून त्वरीत भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - 'त्या' नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार करा; खासदार धानोरकरांची वनमंत्र्यांकडे मागणी