ETV Bharat / state

विना परवानगी बाईक रॅली काढल्याने आमदर भांगडियांसह 8 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद - mla Bhangdiya Chimur

विना परवानगी बाईक रॅली काढून पोलीस विभागाच्या दिशा निर्देशांचे पालन केले नसल्याने आमदार भांगडियांसह त्यांच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. ही माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

Bike Rally mla Bhangdiya Chimur
बाईक रॅली भांगडिया हुतात्मा स्मारक
author img

By

Published : Aug 17, 2021, 10:43 PM IST

चिमूर (चंद्रपूर) - विना परवानगी बाईक रॅली काढून पोलीस विभागाच्या दिशा निर्देशांचे पालन केले नसल्याने आमदार भांगडियांसह त्यांच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. ही माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

घटनास्थळावरील दृश्य

हेही वाचा - सर्वाधिक 'विकास' माझ्या कार्यकाळात, म्हणूनच घोटाळ्यांचे आरोप; चंद्रपुरच्या महापौरांचा दावा

16 ऑगस्टला चिमूर क्रांती शहीद स्मृती दिनानिमीत्त शहिदांना मानवंदना देण्याकरीता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजीत शासकीय दौरा होता. या नियोजीत कार्यक्रमानुसार चिमूर महामार्ग नजीकच्या हुतात्मा स्मारक येथे मंत्री विजय वडेट्टीवार हे आपले मनोगत व्यक्त करीत होते. त्या दरम्यान आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात बाईक रॅली नेहरू चौकातून हुतात्मा स्मारक पुढे आली. तिथून पुढे न जाता मोठ्याने घोषणा देण्यात आल्या ज्यामुळे काही काँग्रेस कायकर्त्यांनी रॅली जवळ येऊन रॅली पुढे घेऊन जाण्याचे सांगितले. यामुळे भाजप कार्यकर्तेसुद्धा संतापले ज्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तेक्षेप करून दोन्ही समुहांना एक मेकांपासून दूर नेले.

नऊ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल -

केंद्र, राज्य व सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशाप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत कोणत्याही गर्दी होणाऱ्या राजकीय, धार्मीक, सामाजिक, सांस्कृतिक निवडणूक प्रचार, सभा रॅली मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे. याही वर विना परवानगी बाईक रॅली आमदार भांगडियांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या दरम्यान पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या दिशा निर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, असा ठपका ठेऊन आमदार बंटी भांगडिया, गोलू भरडकर, अजित सुकारे, राजु देवतळे, विवेक कापसे, नैनेश पटेल, कन्हैयासिंग भौंड, पिंटू उर्फ विशाल खाटीक, स्वप्नील शेंडे या नऊ व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहिता १८६, १८७, १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर ३० व्यक्तींची ओळख करणे सुरू आहे. यामुळे गुन्हा नोंदविलेल्या व्यक्तींची संख्या चौकशीअंती वाढू शकते, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

हेही वाचा - कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंपनीविरूद्ध प्रहार संघटना आक्रमक, मेडिकल कॉलेजमध्ये आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.