चंद्रपूर - शहराच्या तुकूम परिसरातील एका मशीदीमध्ये आढळलेल्या 11 विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची विलगीकरण कक्षात रवानागी करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या पर्यटन व्हिसाचा त्यांनी गैरवापर केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा... 'मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे कोरोनावरील औषध नाही'
कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजनांची कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेशी व दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: ची माहिती देण्याचे आवाहन केले जात आहे. २५ मार्चला तुकूम परिसरातील एका मशीदीमध्ये अकरा 11 किर्गीस्तान आणि दिल्ली, ओडिसा येथील प्रत्येकी एक असे एकूण 13 व्यक्ती आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी प्रशासनाला स्वतःहून याबाबतची माहिती दिली नाही.
या कारणावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे व्हिसा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान तपासात त्यांच्याकडे असलेला व्हिसा हा पर्यटनासाठी असल्याची बाब समोर आली. तरिही ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर काल बुधवार रात्री शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विदेशी नागरिक अधिनियम कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.