ETV Bharat / state

चंद्रपुरात पहिला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर रुग्णाचा परिसर सील; अडीच हजार कुटुंबाची आरोग्य पथकाद्वारे तपासणी - chandrapur police

चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने कृष्णनगर, संजयनगर दर्गा वार्ड सील केले आहे. रुग्ण ज्या इमारतीत रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करीत होता तेथील 6 कुटुंब होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

covid 19 patient'
चंद्रपुरात पहिला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर रुग्णाचा परिसर सील
author img

By

Published : May 3, 2020, 8:17 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने कृष्णनगर, संजयनगर दर्गा वार्ड सील केले आहे. रुग्ण ज्या इमारतीत रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करीत होता तेथील 6 कुटुंब होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. येथील 28 नागरिकांचे पाचव्या दिवशी नमुने घेतले जाणार आहेत. तसेच कोरोनाग्रस्त कुटुंबातील अन्य तीन सदस्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून या परिसरातील अडीच हजार कुटुंबातील परिसरात 10 हजार लोकांची दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.

14 दिवस दररोज रुग्ण आढळलेल्या भागात तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक चमूच्यामागे एक डॉक्टर काम करणार आहे. परिसरात येण्या-जाण्याचा फक्त एकच मार्ग सुरू असून, ॲम्बुलन्स वगळता कोणतीही वाहने आतमध्ये जाऊ दिले जात नाहीत. परिसरात कंटेनमेंट प्लान सुरू करण्यात आला आहे. यासोबतच परिसराच्या बाहेरील 7 किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून, घोषीत करण्यात आला आहे. तसेच पुढील 14 दिवस ताप आणि आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे. या परिसरातील चौकशी मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी परिसराची पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

उपचार करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी क्वारंटाईन -

रुग्णाला 23 एप्रिलपासून ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. आयसोलेशन वार्डमध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर उपचार केलेल्या काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोबतच रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे. तथापि, गेल्या पंधरा दिवसांपासून चंद्रपूरबाहेर तो गेलाच नसल्याचे सांगितले जात आहे.

त्या दहा नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा -

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कोरोना संसर्ग संशयित म्हणून 125 नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. यातील 117 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 106 नमुने निगेटिव्ह निघाले असून, १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 900 आहे. यापैकी 2 हजार 672 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 228 आहे. तसेच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 216 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.