ETV Bharat / state

चारचाकी पार्किंग करवसुलीतून आर्थिक जोडणीचा नगरसेवक जयस्वाल यांचा मनपासमोर प्रस्ताव

author img

By

Published : Jan 1, 2021, 12:45 PM IST

Updated : Jan 1, 2021, 2:57 PM IST

चंद्रपूर महानगरपालिकेची लोकसंख्या आता पाच लाखांच्या घरात पोचली आहे. सरासरी आकडेवारीनुसार शहरात दररोज 50 ते 100 दुचाकी, चार ते पाच कार, एक ट्रॅक्टर किंवा मालवाहू वाहन खरेदी केले जाते. बरेच लोक वाहने घेतात. मात्र, त्यांच्याकडे या वाहनांसाठी पार्किंगची जागाच नसते. अशावेळी ही लोक आपली वाहने घरासमोरील रस्त्यावरच ठेवतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा वाहनांवर कर लावून मनपाची आर्थिक बाजू सावरण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

चंद्रपूर महापालिका लेटेस्ट न्यूज
चंद्रपूर महापालिका लेटेस्ट न्यूज

चंद्रपूर - कोरोनाच्या काळात सध्या मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीत कमालीची कपात करण्यात आली आहे. विविध करांच्या माध्यमातून होणारी मनपाची वसुलीदेखील जवळपास थांबली आहे. सध्या आर्थिक बाजू सावरण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. दरम्यान, शहरात रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी मनपाच्या आमसभेत सुचविला.

चारचाकी पार्किंग करवसुलीतून आर्थिक जोडणीचा प्रस्ताव

रस्त्यावर वाहने ठेवणाऱ्यांकडून मनपाने कर वसूल करावा

शहरात चारचाकी वाहनांत प्रचंड भर पडली आहे. ही वाहने लोक आपल्या घरासमोरील रस्त्यावरच ठेवत आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणि त्यावर ठेवलेली वाहने यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे अशा वाहनांच्या मालकांकडून दरमहा एक हजार रुपये मनपाने कर लावावा. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडेल. सोबतत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहनांसाठी जागा आहे, ते आपली वाहने रस्त्यावर लावणे बंद करतील, असा पर्याय जयस्वाल यांनी सुचवला आहे. हा विषय त्यांनी दोनदा मनपाच्या आमसभेत मांडला. मात्र, यावर काहीच झाले नसून मनपाचे सत्ताधारी आणि प्रशासनाने यावर गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, असे जयस्वाल यांनी म्हटले आहे. हा सकारात्मक पर्याय चंद्रपूरकरांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी - देवेंद्र फडणवीस

रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या मालकांकडून दरमहा हजार रुपये कर

चंद्रपूर महानगरपालिकेची लोकसंख्या आता पाच लाखांच्या घरात पोचली आहे. सरासरी आकडेवारीनुसार शहरात दररोज 50 ते 100 दुचाकी, चार ते पाच कार, एक ट्रॅक्टर किंवा मालवाहू वाहन खरेदी केले जाते. बरेच लोक वाहने घेतात. मात्र, त्यांच्याकडे या वाहनांसाठी पार्किंगची जागाच नसते. अशावेळी ही लोक आपली वाहने घरासमोरील रस्त्यावरच ठेवतात. अनेक ठिकाणी रस्त्यावर अशा वाहनांच्या रांगाच रांगा लागून दिसतात. या वाहनांमुळे अनेक वॉर्डातील रस्ते गजबजले असतात. शहरात जवळपास हजाराहून अधिक वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. त्यातही कळस म्हणजे काही व्यक्तींकडे पार्किंगची व्यवस्था असतानाही त्यांची वाहने रस्त्यावरच उभी राहात आल्याचे निर्दशनास आले आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. मात्र, मनपा अशी थेट कारवाई यावर करू शकत नाही. अशावेळी या वाहनांच्या मालकांकडून प्रतिवाहन दरमहा हजार रुपये कर आकारण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक जयस्वाल यांनी केली आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह महापालिकेसमोर असलेली आर्थिक समस्याही सुटेल, असे त्यांनी म्हटले आहे.

कर मनपाच्या तिजोरीत

सध्या कोरोनाच्या काळात मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. मनपाला मिळणाऱ्या निधीत कमालीची कपात करण्यात आली आहे. 14 वा वित्त आयोग, नगरोत्थान, दलित वस्ती विकास अशा प्रकारच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. मनपाला मिळणाऱ्या एकूण निधी मध्ये 67 टक्क्याची कपात करण्यात आली आहे. मालमत्ता कर आणि इतर करांची वसुली ही जेमतेम 11 टक्के इतकी आहे. अशा स्थितीत विकासकामे कशी करायची, हा प्रश्न मनपासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे अशा पर्यायावर आता मनपाने गंभीरपणे विचार करणे गरजेचे झाले आहे.

शहरात हजारो वाहने अशीच रस्त्यावर ठेवली जात आहेत. त्यावर प्रति वाहन प्रती माह एक हजार रुपये कर लावल्यास यातून 20 ते 25 लाख महिन्याला मनपाच्या तिजोरीत जमा होतील. हा कर वर्षाकाठी अनेक कोटींच्या घरात जाईल. रस्ते अडसरमुक्त आणि रुंद होतील.

निरुपयोगी वाहनांना जप्त करून लिलाल करण्याचा प्रस्ताव

जी वाहने निरुपयोगी झाली आहेत अशी वाहने रस्त्यावर ठेवण्यात येतात. अशा वाहनधारकांना नोटीस बजावून ती हटविण्याची मुदत देण्यात यावी. असे न केल्यास मनपा प्रशासनाने याची जप्ती करून त्याचा लिलाव करावा. यातून देखील मनपाला उत्पन्न मिळेल. असाही प्रस्ताव दीपक जयस्वाल यांनी मनपाला दिला आहे.

हेही वाचा - विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी टाळा; धनंजय मुंडे यांचे आवाहन

Last Updated : Jan 1, 2021, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.