ETV Bharat / state

कोरोना योद्ध्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस; थंडीत कामगाराची तब्येत बिघडली

सात महिन्यांचा पगार देण्याबाबत शासन व प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. कामगारांचे कमी-जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असा इशारा यावेळी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिला.

कोरोना योद्ध्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस

author img

By

Published : Feb 12, 2021, 10:53 AM IST

चंद्रपूर - डेरा आंदोलनातील कामगार रोशन बुचुंडे यांची गुरुवारी सायंकाळी तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले. तीन दिवसापासून कमालीची थंडी असतानाही कामगार रस्त्यावर झोपत आहेत. सात महिन्यांचा पगार देण्याबाबत शासन व प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. कामगारांचे कमी-जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असा इशारा यावेळी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिला.

कोरोना योद्ध्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस

अजित पवारांचे निर्देश-

या आंदोलनाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले. राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक जयस्वाल यांनी या निवेदनाची प्रत घेऊन मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कामगारांच्या थकीत पगारा बाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून तातडीने पगार जमा करण्याचे निर्देश दिले, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

रिपब्लिकन पक्ष, भूमीपुत्र ब्रिगेडसह अनेक पक्ष, संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा-

जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगार कोरोना योद्ध्यांना सात महिन्याचा पगार थकला आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कामगारांचे मूलं-बाळ व कुटुंबासह डेरा आंदोलन सुरू आहे. या डेरा आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशीही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा मोठा पाठिंबा मिळालेला आहे.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळूभाऊ खोबरागडे , प्रतीक डोर्लीकर, प्रेमदास बोरकर, अशोक टेंभरे , विशाल अलोने, गिरीधर खोब्रागडे, कम्युनिस्ट पार्टीचे राजेश पिंजनकर, भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाशा गावतुरे, डॉ.सिराज खान, करूणा चालखुरे ,अनिता जोगे, माया कोसे, अॅड. प्रशांत सोनुले , अॅड..कपिल भगत, अॅड गुरनुले यांनी आंदोलनस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला तसेच यापुढील आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.