चंद्रपूर - जिल्ह्याच्या सीमांवर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आता आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सध्या 43 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाने कहर सुरू असून कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना देखील याची लागण झाली. त्यात काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जोखमीची जबाबदारी आहे अशांना कोरोना बाधेचा धोका अधिक असतो. ही स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जे पोलीस कर्मचारी जिल्ह्याच्या सीमेवर पहारा देत आहेत. अशा 134 पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी 43 पोलिसांची तपासणी करण्यात आली असून 6 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ही नागपूर, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यासह तेलंगाणा राज्याला लागून आहे. तिथे कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यातही यवतमाळ, नागपूर हा जिल्हा रेड झोनमध्ये आहे. अशावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी गरजेची झाली आहे.
जिल्ह्याचा सीमेवर तैनात पोलिसांची तपासणी; सहा जणांचे स्वॅब घेतले - चंद्रपूर कोरोना
जे पोलीस कर्मचारी जिल्ह्याच्या सीमेवर पहारा देत आहेत. अशा 134 पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी 43 पोलिसांची तपासणी करण्यात आली असून 6 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे.