ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : लग्नसोहळे रद्द झाल्याने मंगल कार्यालयांना 'कुलूप' - wedding hall

चंद्रपूरातील राजुरा शहरात एकूण सहा मंगल कार्यालये आहेत. यात ओम साई मंगल कार्यालय, सम्राट लॉन्य व मंगल कार्यालय, नक्षत्र दान व मंगल कार्यालय, धनोजे कुणबी मंगल कार्यालय, निसर्ग लॉन्स, नगरपरिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 14 एप्रिलपर्यंत या मंगल कार्यालयांमध्ये होणारे जवळपास 60 लग्न सोहळे स्थगित झाल्याची माहिती संचालकांनी दिली आहे.

wedding hall
मंगल कार्यालय
author img

By

Published : Apr 1, 2020, 3:04 PM IST

चंद्रपूर - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशावर संकट कोसळले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत राजुरा शहरातील 6 मंगल कार्यालयातील अंदाजे 60 लग्नसोहळे स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयातील कार्यक्रमांवर अवलंबून असणारे आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री, पुजारी, गायक, वादक, इतर कामगार यांच्यावर कोरोना लॉकडाऊनमूळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

हेही वाचा... COVID-19 : ५० वर्षांहून जास्त वयाच्या कैद्यांना सोडण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल..

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिनांक 22 मार्चला देशभर जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच दि. 25 एप्रिलपासून संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. हे निर्णय होण्याच्या दोन-तीन महिने अगोदरच अनेक कुटुंबीयांनी लग्न सोहळ्याचे नियोजन केले होते. काहींनी अनेक दिवस अगोदर लग्न सोहळ्यांसाठी मंगल कार्यालये बुक करून ठेवली होती. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या संकटामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आणि याचा सर्वात मोठा फटका मंगल कार्यालय मालक आणि कार्यालयातील संबंधीत कामगार, मजूरांना बसला आहे.

चंद्रपूरातील राजुरा शहरात एकूण सहा मंगल कार्यालये आहेत. यात ओम साई मंगल कार्यालय, सम्राट लॉन्स व मंगल कार्यालय, नक्षत्र दान व मंगल कार्यालय, धनोजे कुणबी मंगल कार्यालय, निसर्ग लॉन्य, नगरपरिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 14 एप्रिलपर्यंत या मंगल कार्यालयांमध्ये होणारे जवळपास 60 लग्न सोहळे स्थगित झाल्याची माहिती संचालकांनी दिली आहे.

हेही वाचा... जगभरामध्ये 7 लाख 54 हजार 948 जणांना कोरोनाची बाधा, तर 36 हजार नागरिक दगावले

मार्चपासून लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालये मोठ्याप्रमाणावर राखीव करण्यात येतात. यासाठी काही रक्कम आगाऊ देऊन तारीखा बुक केल्या जातात. वधू वरांकडील आर्थिक परिस्थिती व त्यांच्या आवडीनिवडीनुसार केटरिंग सुविधा आणि जेवणाचे मेन्यु ठरवले जातात. मंडप सजावट, संगीत योजना, वाजंत्री या सर्व गोष्टी आर्थिक परिस्थितीशी निगडित असतात. मात्र, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आला आणि मंगल कार्यालयांतील सर्व कार्यक्रम स्थगित झाले आहे.

पुणे-मुंबई शहराकडे लग्नसोहळे आनंदात आणि शाहीरितीने साजरा करण्यासाठी काही कुटुंबीयांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कोरोनाच्या संकटासमोर सर्वकाही हतबल झाले आहेत. शासनाच्या आदेशानंतर मंगल कार्यालये सुरू होतील. वधू वरांकडील मंडळींना त्यांच्या सोयीने योग्य त्या पुढील तारखा देण्यात येतील. सध्या देशासमोर कोरोनाचे संकट उभे असल्यामुळे सर्वांनी या लढाईत जिंकण्यासाठी मिळून सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत राजुरातील या मंगल कार्यालयांच्या मालक आणि संचालकांनी मांडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.