ETV Bharat / state

Controversy over demolition of monastery wall : मठाची भिंत पाडल्याचा वाद ; काँग्रेसचे राहुल पुगलिया यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल - demolition of monastery wall case registered

मठाची भिंत पाडल्यावरून झालेल्या वादात काँग्रेसचे नेते राहुल पुगलिया ( Rahul Puglia of Congress )यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला ( case registered against Rahul Puglia ) आहे. मठाचे विश्वस्त किशोर कपूर यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( demolition of monastery wall case registered ) आहे.

Congress leader Rahul Puglia
काँग्रेस नेते राहुल पुगलिया
author img

By

Published : Sep 16, 2022, 10:21 AM IST

चंद्रपूर : मठाची भिंत पाडल्यावरून झालेल्या वादात काँग्रेसचे नेते राहुल पुगलिया यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला ( case registered against Rahul Puglia ) आहे. राहुल पुगलिया हे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पुत्र आहेत. मठाचे विश्वस्त किशोर कपूर यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( demolition of monastery wall case registered ) आहे.

राहुल पुगलिया यांनी भिंत तोडून मलाबा नेला दाखल झालेल्या तक्रारीनुसार शहरातील बालाजी वार्ड येथे श्री संत गुलाबदास महाराज यांचा मठ आहे. या मठाचे विश्वस्त म्हणून 66 वर्षीय किशोर कपूर व मुकुंद टंडन हे काम बघतात. 14 सप्टेंबरला हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया व राजेश काशीयावाले यांनी मठाची भिंत तोडून त्याचा मलबा नेला ( demolition of monastery wall in Chandrapur ) होता. त्यावेळी त्यांना भिंत का तोडली ? मलबा का नेला ? याबाबत हटकले असता त्यांनी कपूर यांना तुमच्याने जे होते ते करून घ्या, अशी धमकी दिली.

राहुल पुगलिया यांनी नागरिकांना भडकावीत उत्तेजित करून मारहाणीस प्रवृत्त केले 15 सप्टेंबरला पुन्हा हेमंत आक्केवार, राजेश काशियावाले, रोहित पुगलिया व बंजारीवाले यांनी मठात प्रवेश करीत मठाची भिंत तोडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी कपूर यांनी तुम्ही मठाचे सदस्य किंवा विश्वस्त नाही, असे गैरकायदेशीर कार्य करू नका, असे म्हणत त्यांना हटकले. मात्र कांग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया ( Rahul Puglia of Congress ) यांनी नागरिकांना भडकावीत उत्तेजित केले व आम्हाला शिवीगाळ करीत 10 ते 12 लोकांना आम्हाला मारहाण करण्यास प्रवृत्त केले. यावेळी हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया व राजेश काशीयावाले यांनी वयोवृध्द कपूर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

कपूर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. कपूर यांच्या तक्रारीवरून हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया, राहुल पुगलिया, राजेश काशियावाले, बंजारीवाले यांच्याविरुद्ध कलम 143, 147, 149, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ( Controversy over demolition of monastery wall ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.