ETV Bharat / state

MP Balu Dhanorkar on Corona Situation : नुसते निर्बंध लावून काय उपयोग? ठोस उपाययोजना करा; काँग्रेसच्या खासदाराचा घरचा अहेर - बाळू धानोरकर सरकारवर टीका

काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर ( Congress MP Balu Dhanorkar ) यांनी केंद्र सरकारसह राज्यातील महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. कोरोनाच्या नावावर फक्त निर्बंध लावणे सुरू आहे. बेरोजगारी वाढत आहे, दुकानदार व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळी निर्बंधाने काहीच उपयोग होणार नाही, अशी प्रतिक्रिया देत धानोरकरांनी राज्य सरकारलाही धारेवर धरले. ( MP Balu Dhanorkar Criticized MVA Government over Corona Situation )

mp balu dhanorkar
खासदार बाळू धानोरकर
author img

By

Published : Jan 12, 2022, 5:11 PM IST

Updated : Jan 12, 2022, 9:23 PM IST

चंद्रपूर - काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर ( Congress MP Balu Dhanorkar ) यांनी केंद्र सरकारसह राज्यातील महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. कोरोनाच्या नावावर फक्त निर्बंध लावणे सुरू आहे. मात्र, यावर अद्यापही ठोस उपाय सरकार शोधू शकले नाही. दर काही दिवसांनी वेगवेगळे निर्बंध लावले जात आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बेरोजगारी वाढत आहे, दुकानदार व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळी निर्बंधाने काहीच उपयोग होणार नाही, अशी प्रतिक्रिया देत धानोरकरांनी राज्य सरकारलाही धारेवर धरले. ( MP Balu Dhanorkar Criticized MVA Government over Corona Situation )

खासदार बाळू धानोरकर याबाबत बोलताना

काय म्हणाले खासदार बाळू धानोरकर?

दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या नावावर फक्त उपाययोजना करत बसलो. मात्र, अजूनही यावर आपण औषध शोधू शकलो नाही. केंद्र सरकार, राज्य सरकारचे संशोधन केंद्र काय करीत आहे याचा अजून थांगपत्ता नाही. आजही आपण विदेशातून पाठवलेल्या लसीबद्दल बोलतोय. लसीकरणाच्या खात्रीबद्दल अजूनही राज्य सरकार, केंद्र सरकार बोलायला तयार नाही. ही लस किती दिवस सुरक्षित ठेवेल याचे काही तारतम्य नाही. आधी सांगितले तीन महिने लसीकरण सुरक्षित ठेवेल, नंतर सहा महिने आणि आता लसी उपलब्ध नाहीत तर नऊ महिने ही लस सुरक्षित ठेवेल, असे सांगण्यात येत आहे. याला काहीही अर्थ नाही आहे. आधी प्लाझ्मा थेरपी, कॉकटेल थेरपी अशा पद्धतीच्या थेरपी काढण्यात आल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ही उपाययोजना सपशेल अपयशी ठरली. केंद्र सरकारसह राज्य सरकार देखील याला तेवढेच दोषी आहे. किती दिवस लोकांनी बूस्टर डोझ घेत बसायचे. हे सर्व निर्बंध शिथिल व्हायला हवे, असे म्हणत धानोरकरांनी राज्य सरकारवरही टीका केली.

हेही वाचा - महापौरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट, किरीट सोमैया यांचा आरोप

धानोरकरांच्या प्रतिक्रियेचा राजकीय अर्थ काय?

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्यातून निवडून आलेले एकमेव खासदार आहेत. त्यांनी पाहिल्यांदाच राज्य सरकारच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना आणि हाताळणीला धारवेवर धरत आपली खदखद व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेने आता उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांकडून अधूनमधून खदखद व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आपापसातील समन्वयातुन या समस्या सोडविल्या जात होत्या. आता धानोरकरांनी थेट राज्य सरकारला धारेवर धरल्याने याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Jan 12, 2022, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.