चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी स्पष्ट झाले. यामध्ये राज्यात सेना-भाजप युतीला मागच्यावेळ सारखेच यश मिळाले. राष्ट्रवादीनेही काही महत्वाच्या जागांवर पराभव स्वीकारला, मात्र २०१४ चा आकडा कायम राखण्यात त्यांनी यश मिळवले. काँग्रेसला मात्र, एका जागेवर समाधान मानत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. चंद्रपूर मतदारसंघात केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत काँग्रेसचे बाळू धानोरकर हे जायंट किलर ठरले.
राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, काँग्रेसने राज्यात जी एकमेव जागा जिंकली; ही तीच जागा आहे, ज्यावर तिथल्या कार्यकर्त्यांनी बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पुढे कार्यकर्त्याच्या दबावानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि शेवटी तेच काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ठरले.
चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची धानोरकर यांची इच्छा होती. मात्र, काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नव्हती. त्यानंतर आमदार धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा सोपवला. पुढे काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी मुंबईत पक्ष श्रेष्ठीची भेट घेतली. मात्र, सुरुवातीला पक्षश्रेष्ठींनी शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर यांना तिकीट देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांचे नाव समोर आले. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शविला. एखादा पार्सल उमेदवार आम्हाला नको, असे त्यांचे म्हणणे होते. उमेदवार हा जिंकून येणारा असावा बाळू धानोरकर यांना संधी दिल्यास ते युतीचे मते कमी करतील. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करण्याची क्षमता आहे, असे म्हणणे आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचे होते. त्यामुळे त्यांनी बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली.
काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता-
मात्र, हायकमांडने त्यावर शिकामोर्तब केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी विनायक बांगडे यांना ही उमेदवारी देण्यात आली. त्यांचे नाव जाहीर होताच काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. बांगडे हे जिंकून येण्यास सक्षम नाहीत असा, सूर उठू लागला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एक मोठी घडामोड घडली. शेवटी ऐनवेळी विनायक बांगडे यांच्या ऐवजी बाळू धानोरकरांचे नाव जाहीर करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या मागणीमुळेच पक्षश्रेष्ठींना निर्णय बदलावा लागला आणि तो निर्णय आज काँग्रेसची राज्यात लाज राखणारा ठरला. धानोरकरांनी चंद्रपुरात थेट केंद्रीय गृहराज्य मंत्री यांचा पराभव करून जायंट किलरची भूमिका निभावली. धानोरकर यांनी अहीर यांचा पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. बाळू धानोरकर महाराष्ट्रातले एकमेव काँग्रेसचे खासदार ठरले.
काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर ठरले 'जायंट किलर'; यांनाच नाकारले होते पक्षाने तिकीट

काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Conclusion: