ETV Bharat / state

'आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी देणार पाठींबा'

author img

By

Published : Oct 26, 2019, 9:37 AM IST

Updated : Oct 26, 2019, 9:56 AM IST

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, असे मत काँग्रसचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

आ. सूभाष धोटे

चंद्रपूर - शिवसेनेला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ऑफर दिलेली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला भाजप तयार होत नसेल, तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायला आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देईल. आम्हाला मंत्रीपदाची गरज नाही, असे मत काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सूभाष धोटे यांनी व्यक्त केले. गोंडपिपरीतील सभेत ते बोलत होते.

बोलताना आ. सुभाष धोटे

राजुरा विधानसभा क्षेत्रात यावेळी अटीतटीची लढत झाली. गोंडपिपरीने आम्हाला कौल दिला. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राजुरा विधानसभेचा सर्वांगीण विकास हे आपले कायम ध्येय राहिले आहे. त्यातच गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला अतिप्राध्यान दिल जाईल, असे आश्वासन धोटे यांनी दिले. गोंडपिपरीत सुभाष धोटे यांच्या विजयानिमित्त रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

गोंडपिपरी तालुक्याने सुभाष धोटेंना निवडून दिले. त्यामुळे आमदारांनी तालुक्याचा विकास करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. यावेळी सुभाष धोटेंनी गोंडपिपरीच्या विकासासाठी सदैव तत्पर असून फसव्या दत्तकाचा शब्द न देता, जे करता येईल ते करण्याचे आश्वासन दिले.

गोंडपिपरीच्या प्रशासनाला शिस्त लावणार
मागास दुर्लक्षित गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही वर्षात लाचार लोकप्रतिनिधींमुळे प्रशासनाला कुपोषण झाले आहे. यामुळे गोंडपिपरीच्या विकासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिस्त लावून प्रशासकीय समन्वयातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तर असल्याचे नवनिर्वाचीत आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले.

Intro:आदीत्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायला बाहेरून पाठींबा ; सूभाष धोटे

चंद्रपुर

शिवसेनेला आम्हचा वरिष्ठ नेत्यांनी आॕफर दिलेली आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला भाजप तयार होत नसेल तर आदित्य ठाकरेना मुख्यमंत्री करायला आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देईल.आम्हाला मंत्रीपदाची गरज नाही असे मत काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सूभाष धोटे यांनी व्यक्त केले.गोंडपिपरीतील सभेत ते बोलत होते.

राजुरा विधानसभा क्षेत्रात यावेळी अटीतटीची लढत झाली.गोंडपिपरीने आम्हाला कौल दिला.या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
राजुरा विधानसभेचा सर्वागिण विकास हे आपले कायम ध्येय राहिले आहे.त्यातच गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला अतिप्राध्यान दिल जाईल.असे आव्हान धोटे यांनी केले. गोंडपिपरीत सुभाष धोटे यांच्या विजयानिमित्त रँली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी,तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,नगराध्यक्षा सपना साखलवार,उपसभापती अशोक रेचनकर,सःतोष बंडावार,देविदास सातपुते,नामदेव सांगळा,अनील कोरडे,गौतम झाडे,राष्ट्रवादीचे सुरज माडूरवार,संजय माडूरवार,राजू जृंदेल,सुनील संकूलवार,युवा नेता विपीन चौधरी,विनोद दुर्गे,यांच्यासह,अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थीती होती.
गोंडपीपरी तालुक्याने सुभाष धोटेंना निवडून दिले.त्यामुळे,आमदारांनी तालुक्याचा विकास करावा.अशी मागणी झाली.
यावेळी सुभाष धोटेंनी गोंडपिपरीच्या विकासाकरिता सदैव तत्पर असून फसव्या दत्तकाचा शब्द न देता जे ,जे करता येईल ते ते करण्याचे आश्वासन
दिले.
गोंडपिपरीच्या प्रशासनाला शिस्त लावणार
मागास दुर्लक्षित गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही वर्षात लाचार लोकप्रतिनिधींमुळे प्रशासनाला कुपोषण झाले आहे
त्याला मोडण्यासाठी आहो,प्रशासकीय अधिकाऱ्यांना धडा शिकवून प्रशासकीय समन्वयातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तर असल्याचे नवनिर्वाचीत आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले .
गोंडपिपरी तालुक्यातील गावागावातील शेकडो,कार्यकर्ते यावैळी उपस्थीत होते.Body:विडीओConclusion:
Last Updated : Oct 26, 2019, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.