ETV Bharat / state

चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका

२०१५ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीमध्ये सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २२ नोव्हेंबरला या सर्व सदस्यांना अपात्र घोषित केल्याचे आदेश दिले. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे तालुका निवडणूक विभागाने १९३ सदस्यांना नोटीस बजावल्या आहेत.

chd
चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
author img

By

Published : Dec 4, 2019, 11:12 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात २०१५ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीमध्ये सादर केले नाही. यामुळे तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीतील १९३ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या अपात्र सदस्यांमध्ये सर्वाधिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्यांचा समावेश आहे.

चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये नाम निर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र त्यावेळी उपलब्ध नसल्यास निवडणूक विभागाच्या विहित मुदतीमध्ये ते जोडावे लागते. मात्र, चिमूर तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीमधील २०७ सदस्यांनी विहित मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही. यापैकी अनुसूचित जमाती प्रवर्गातील १४ सदस्यांचे प्रकरण हे न्याय प्रविष्ठ आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी २२ नोव्हेंबरला या सर्व सदस्यांना अपात्र घोषित केल्याचे आदेश दिले. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे तालुका निवडणूक विभागाने १९३ सदस्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

हेही वाचा - जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर

अपात्र घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सर्वाधिक १२७ स्त्री सदस्यांचा समावेश आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांमध्ये १३७ सदस्य आरक्षित अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील २८ सदस्य, तर नामाप्र प्रवर्गातील ४० सदस्य अपात्र घोषित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीमधील माना या जमातीला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी जात असल्याने माना जमातीच्या सदस्यांना अपात्रतेच्या नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे ज्यांची आर्थिक परीस्थिती बरी आहे, असेच सदस्य जात वैधता प्रमाणपत्राकरिता न्यायालचे दार ठोठावत आहेत. तर, चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने धावपळ वाढल्याचे चित्र आहे.

लहान ग्रामपंचायतीमध्ये पेच -

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील लहान ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित झाल्याने पेच निर्माण झालेला आहे. यामध्ये खांबाडा ६, विहीरगाव ५, अडेगाव देश ५, मुरपार तुकूम ६, सातारा ५, बोरगाव बुट्टी ६, चक जाटेपार ६, खानगाव ५, जांभुळविहीरा ५ व नविन नवेगाव (पुर्नवसित) येथील ७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित झालेले आहेत.

हेही वाचा - चंद्रपुरात 68 हजारांची दारू जप्त; आरोपी फरार

Intro:चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
मुदततित जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका
सर्वाधिक अनुसुचित जमाती सदस्यांचा समावेश
चिमूर
चिमूर तालुक्या मध्ये २०१५ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या .या निवडणुकां मध्ये विजयी झालेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर केलेच नाही . यामूळे तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीमधील १९३ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषीत केल्याने राजकिय खळबळ माजलेली आहे .या अपात्र सदस्या मध्ये सर्वाधिक अनुसुचित जमाती प्रवर्गातिल माना जमातीच्या समावेश आहे .
निवडणुक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे सार्वजनीक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये नाम निर्देशन पत्रा सोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते . हे प्रमाणपत्र त्या समयी उपलब्ध नसल्यास निवडणुक विभागाच्या विहित मुदती मध्ये जोडणे आवश्यक असते . मात्र चिमूर तालुक्यातील ७८ ग्रामपंचायती मधील २०७ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदती मध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही .यापैकी अनुसुचित जमाती प्रवर्गातील १४ सदस्यांचे प्रकरण हे न्याय प्रविष्ठ आहे .सर्व सदस्यांना अपात्र घोषीत केल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २२ नोहेंम्बरला दिले . जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे १९३ सदस्यांना तालुका निवडणुक विभागाने नोटीस बजावले आहेत .
अपात्र घोषीत करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्या मध्ये सर्वाधिक १२७ स्त्री सदस्यांचा समावेश आहे . जात वैधताप्रमाण पत्र सादर न करणाऱ्या मध्ये आरक्षीत १३७ अनुसुचित जमाती प्रवर्गा तिल सदस्य आहेत . अनुसुचित जाती प्रवर्गातील २८ सदस्य तर नामाप्र प्रवर्गातील ४० सदस्य अपात्र घोषीत करण्यात आले आहेत . अनुसुचित जमाती मधील माना या जमातीला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्या मध्ये अडचणी जात असल्याने माना जमातीच्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेच्या नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे . ज्यामूळे ज्यांची आर्थिक परीस्थिती बरी आहे असे सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा करीता न्यायाचे दार ठोठावतात . चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायत सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात आल्याने धावपड वाढलेली आहे .
O०
लहान ग्रामपंचायती मध्ये पेच :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील लहान ग्रामपंचायती मधील ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषीत झाल्याने पेच निर्माण झालेला आहे .खांबाडा ६ , विहिरगाव ५ , अडेगाव देश ५ , मुरपार तुकुम ६ , सातारा ५ , बोरगाव बुट्टी ६ , चक जाटेपार ६, खानगाव ५ , जांभुळविहीरा ५ व नविन नवेगाव ( पुनरवसीत ) ७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषीत झालेले आहेत .Body:चिमूर तहसील कार्यालयConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.