ETV Bharat / state

राजुरा शहरात कोळसा व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या - chandrapur crime news

राजुरा शहरातील एका सलून दुकानात अज्ञात हल्लेखोरांनी एका कोळसा व्यापाऱ्याला गोळ्या घालून ठार केले आहे.

मृत राजू यादव
मृत राजू यादव
author img

By

Published : Jan 31, 2021, 7:53 PM IST

चंद्रपूर - कोळसा व्यापाऱ्याला भर चौकात अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना राजुरा शहरात रविवारी (दि. 31 जाने.) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. राजू यादव (मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. राजुरा), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे फोफावत चालले असून वाळू तस्करी, कोळसा तस्करी, दारू तस्करी, कोंबडबाजार, असे अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहे. यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून त्यांच्यात आता जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. राजू यादव हा व्यापारी मूळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून राजुरा येथे कोळशाचा व्यापार करत होता. राजुरा परिसरात कोळशाच्या खाणी असून येथे अवैध कोळशाचा व्यापारही जोमात चालतो. रविवारी (दि. 31 जाने.) राजू यादव हा एका सलूनमध्ये गेला असता त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची खबर शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.