ETV Bharat / state

हूमन प्रकल्‍पाबाबत मुख्‍यमंत्र्यांची आढावा बैठक, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा - cm uddhav thackeray

महत्‍वपूर्ण सिंचन प्रकल्‍प असलेल्‍या हूमन सिंचन प्रकल्‍पाबाबत आज मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे.

cm
मुख्यमंत्री
author img

By

Published : Jan 24, 2020, 9:47 AM IST

चंद्रपूर - जिल्‍ह्यातील महत्‍वपूर्ण सिंचन प्रकल्‍प असलेल्‍या हूमन सिंचन प्रकल्‍पाबाबत आज मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे. विधीमंडळाच्‍या नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जिल्‍ह्यातील विकासकामे व प्रकल्‍पांचा आढावा घेण्‍यासाठी बैठक घेतली होती. यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हूमन प्रकल्‍पाबाबत स्‍वतंत्र उच्‍चस्‍तरीय बैठक बोलावण्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्‍यात आली आहे.

हेही वाचा - 'झेंड्यापेक्षा विचार महत्वाचा, राज ठाकरेंची भाजपविरोधी धार कमी होणार नाही'

चंद्रपूर जिल्‍ह्यातील सिंदेवाही तालुक्‍यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रस्तावित हा प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यास जिल्ह्यातील 160 गावांकरिता 46 हजार 117 हेक्‍टर सिंचननिर्मिती होणार आहे. त्‍यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्‍पालगतच्‍या वनक्षेत्रातील वन्‍यजीवांसाठी पाण्‍याची सोय होऊन अतिमागासीत आदिवासी भागाचा विकास होण्‍यास मदत होऊन नक्षलवादी हालचालींवर अंकुश बसेल. या प्रकल्‍पाला सर्वोच्‍च न्‍यायालयाची मान्‍यता मिळाल्‍याने त्याचे बांधकाम लगेच सुरू करणे क्रमप्राप्‍त असल्‍याचे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी नागपुरातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैठक आयोजित करण्‍याची विनंती केली होती.

त्‍यानुसार ही बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री, वनमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती राहणार आहे.

Intro:

चंद्रपूर : जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण सिंचन प्रकल्‍प असलेल्‍या हूमन सिंचन प्रकल्‍पाबाबत उद्या 24 जानेवारीला मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे. विधीमंडळाच्‍या नागपूर येथील अधिवेशनात मुख्‍यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील विकासकामे व प्रकल्‍पांचा आढावा घेण्‍यासाठी बैठक घेतली होती. यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हूमन प्रकल्‍पाबाबत स्‍वतंत्र उच्‍चस्‍तरीय बैठक बोलाविण्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. त्‍यानुसार ही बैठक आयोजित करण्‍यात आली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील सिंदेवाही तालुक्‍यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रसतावित हा प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यास चंद्रपूर जिल्‍हयातील 160 गावांकरिता 46,117 हेक्‍टर सिंचन निर्मीती होणार आहे. त्‍यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्‍पालगतच्‍या वनक्षेत्रातील वन्‍यजीवांसाठी पाण्‍याची सोय होवून अति मागासीत आदिवासी भागाचा विकास होण्‍यास मदत होवून नक्षलवादी हालचालींवर अंकुश बसेल. या प्रकल्‍पाला सर्वोच्‍च न्‍यायालयाची मान्‍यता मिळाल्‍याने त्याचे बांधकाम त्‍वरीत सुरू करणे क्रमप्राप्‍त असल्‍याचे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी नागपूरातील आढावा बैठकीत मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना बैठक आयोजित करण्‍याची विनंती केली होती. त्‍यानुसार ही बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री, वनमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती राहणार आहे. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.