चंद्रपूर : एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde claim of gold mines) यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी (Gold Mines In Chandrapur) असल्याचे विधान केले होते. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असून या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी हा दावा फेटाळून (Gold mines claim rejected by geological scientists) लावला आहे. Chandrapur Gold mines claim, latest news from Chandrapur
त्याला सोन्याची खाण म्हणता येणार नाही : ज्या ठिकाणी सोने सापडल्याच्या चर्चा आहे ते ठिकाण बल्लारपूर तालुक्यातील बामणी आणि सिंदेवाही तालुक्यातील मिनझरी या ठिकाणी आहे. येथे तांब्याचा साठा (Copper Mines in Chandrapur) सापडला आहे. त्याठिकाणी सोन्याचे किंचितसे कण असतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला सोन्याची खाण म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तिथे तांब्याचे साठे असण्याची शक्यता : मुख्यमंत्री शिंदे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोन्याच्या खाणी संदर्भातील वक्तव्यानंतर बल्लारपूर तालुक्यातील बामणी आणि सिंदेवाही तालुक्यातील मिनझरी ही गावे चर्चेत आली. या दोन्ही गावा शेजारी सन २०१३, १४ आणि १५ ला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि राज्याच्या भूविज्ञान-खनिकर्म विभागातर्फे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. या परिसरातील भूगर्भातील नमुने घेण्यात आले. या संदर्भातील अंतिम अहवाल २०१५ मध्ये पाठविण्यात आला. तिथे तांब्याचे साठे असण्याची शक्यता आहे. एरवी तांबे असलेल्या खाणीत सोन्याचे कण आढळताच. त्याला सोन्याची खाण म्हणता येणार नाही, असे भूविज्ञान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता फेटाळली : विशेष म्हणजे सन २०२० मध्ये इंडियन मिनरलने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. देशात कोणत्या ठिकाणी कुठली खनिज आहेत. याची माहिती या अहवालात असते. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा उल्लेखच नाही. केंद्रीय खाण मंत्रालयाचा सन २०२१ च्या अहवाल सुद्धा सोने आढळ्याचे नमूद नाही. मिनरल रिझर्व इन महाराष्ट्र यांचा ३१ मार्च २०१४ अहवालात चंद्रपूर जिल्हयात नेमकी कोणती खनिज उपलब्ध आहेत. याची माहिती आहे. यामध्ये कोळसा, चुनखडी, लोहखनिज, पायरोफिलाईट, बराईट, फ्लोराईड, तांबे, क्रोमाईट, ग्रेनाईट यांचा समावेश आहे. या अहवालातसुद्धा सोन्याचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा फेटाळून लावली. सिंधुदर्ग आणि नागपूर काही ठिकाणी सोन्याचे साठे आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागपूर ऐवजी चुकीने चंद्रपूरचा उल्लेख केला, अशी शक्यता प्रा. चोपणे यांनी बोलून दाखविली.