ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार घोषित; चंद्रपूरमधून अ्ॅड. राजेंद्र महाडोळे मैदानात - dharm

भाजपनेही गेल्या साडेचार वर्षांत बहुजन समाजाची दिशाभूल करून सत्तेसाठी वापर करून घेतल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

आंबेडकर
author img

By

Published : Feb 26, 2019, 11:35 PM IST

चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडीचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार आज (मंगळवार) घोषित करण्यात आला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चांदा येथील क्लब मैदानावर आयोजित वंचित समाज राजकीय हक्क एल्गार परिषदेत चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी अॅड. राजेंद्र महाडोळे यांची उमेदवारी घोषित केली.

ते पुढे म्हणाले, राजकीय सत्तेसाठी काँग्रेसने नेहमीच बहुजन समाजाचा वापर करून घेतला. तोच कित्ता भाजप सरकार गिरवत आहे. भाजपनेही गेल्या साडेचार वर्षांत बहुजन समाजाची दिशाभूल करून सत्तेसाठी वापर करून घेतल्याची टीका आंबेडकर यांनी केली. यावेळी कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र आंबेडकर, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, माजी मंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, संजय हेडाऊ, जयदीप खोब्रागडे, रामराव चव्हाण, राजेंद्र घाटे, नाना लोखंडे, अमोल गुरुनुले, प्रवीण पेटकर, डी.के.बापू माळी, नानाजी आदे, मनोज अंबाडकर, प्रा. नान्हे, प्रा. कोहळे, शकील पटेल, इरफान शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, आमचा धर्माला विरोध नाही, मात्र राजकीय पक्षाला धर्म असावा, हे आम्ही मानत नाही. मात्र, अलीकडे राजकीय धर्माच्या नावावर राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे जनतेनी आता सावध होण्याची वेळ आली आली. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्थापितांनी धसका घेतला आहे.

undefined

आघाडीसाठी काँग्रेस हात धुवून मागे लागली आहे. आम्ही आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही, कारण काँग्रेसलाही मनुवाद पोसायचा असल्याचा आरोप करत मोदी पुन्हा सत्तेवर येऊ नये, असे वाटत असेल तर काँग्रेसने निवडणुकीतून माघार घ्यावी आणि वंचित बहुजन समाज आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.

मोदी सरकार म्हणजेच कोणतेही विदेशी धोरण नसलेले सरकार आहे. पाकिस्तान जगभरात कटोरा घेऊन फिरत असताना सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानला मदत दिली तेव्हा नरेदी मोदी काय करीत होते? असा प्रश्न करीत पाकिस्तानला मदत करीत असाल तर इंधन सौदी अरेबियाकडून खरेदी केले जाणार नाही असा दम, पंतप्रधानांनी सौदीच्या अध्यक्षांना का भरला नाही, असे सांगत मोदीच्या विदेशी धोरणावर त्यांनी टीका केली. पुलवामा येथील हल्ल्याविषयी बोलताना २०० किलो आरडीएक्स भारतात आलेच कसे. आरडीएक्स भरलेले वाहन जवानांच्या वाहनांपर्यंत पोहोचले कसे? असे प्रश्न उपस्थित करीत पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाला वंचित समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Intro:(ही सभा लाईव्ह झाली होती, व्हिडिओ तिथून घ्या)

चंद्रपुर : वंचित बहुजन आघाडीचा चंद्रपुर लोकसभेचा उमेदवार आज घोषित करण्यात आला. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी हे जाहीर केले.
यावेळी त्यांनी सभेला संबोधित केले.Body:
राजकीय सत्तेसाठी काँग्रेसने नेहमीच बहुजन समाजाचा वापर करून घेतला. तोच कित्ता भाजपा सरकार गिरवित असून, भाजपानेही गेल्या साडेचारवर्षांत बहुजन समाजाची दिशाभूल करून सत्तेसाठी वापर करून घेतल्याची टीका भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन समाज आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात मंगळवारी केली. येथील चांदा क्लब मैदानावर आयोजित वंचित समाज राजकीय हक्क एल्गार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी चंद्रपूर-आणि लोकसभा मतदार संघासाठी ॲड. राजेंद्र महाडोळे यांची उमेदवारी घोषीत केली.
कार्यक्रमाला ॲड. राजेंद्र आंबेडकर, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, माजी मंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, संजय हेडाऊ, जयदीप खोब्रागडे, रामराव चव्हाण, राजेंद्र घाटे, नाना लोखंडे, अमोल गुरुनुले, प्रवीण पेटकर, डी.के.बापू माळी, नानाजी आदे, मनोज अंबाडकर, प्रा. नान्हे, प्रा. कोहळे, शकील पटेल, इरफान शेख आदी उपस्थित होते.Conclusion:
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, आमचा धर्माला विरोध नाही, मात्र राजकीय पक्षाला धर्म असावा हे आम्ही मानत नाही. मात्र, अलीकडे राजकीय धर्माच्या नावावर राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे जनतेनी आता सावध होण्याची वेळ आली आली. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तापितांनी धसका घेतला आहे. आघाडीसाठी काँग्रेस हात धुवून मागे लागली आहे. आम्ही आरएसएस ला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही, कारण कारण काँग्रेसलाही मनुवाद पोसायचा असल्याचा आरोप करीत मोदी पुन्हा सत्तेवर येऊ नये असे वाटत असेल तर काँग्रेसने निवडणुकीतून माघार घ्यावी आणि वंचित बहुजन समाज आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा , असे असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.
मोदी सरकार म्हणजेच कोणतेही विदेशी धोरण नसलेले सरकार आहे. पाकिस्तान जगभरात कटोरा घेऊन फिरत असताना सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानला मदत दिली तेव्हा नरेदी मोदी काय करीत होते? असा प्रश्न करीत पाकिस्तानला मदत करीत असाल तर इंधन सौदी अरेबियाकडून खरेदी केले जाणार नाही असा दम, पंतप्रधानांनी सौदीच्या अध्यक्षांना का भरला नाही असे सांगत मोदीच्या विदेश धोरणावर त्यांनी टीका केली. पुलवामा येथील हल्ल्याविषयी बोलताना २०० किलो आरडीएक्स भारतात आलेच कसे. आरडीएक्स भरलेले वाहन जवानांच्या वाहनांपर्यंत पोहोचले कसे असे प्रश्न उपस्थित करीत पुलावा येथील दहशतवादी हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाला वंचित समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.