चंद्रपूर - जागतीक तापमानात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद करण्यात झाली आहे. 43.6 डिग्री इतकी नोंद चंद्रपूर शहरातील तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात सूर्य आग ओकत आहे. कधी नव्हे ते मार्च महिन्यात 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती.
गेल्या 50 वर्षांचा तापमानाचा विक्रम यावर्षी तुटला. पुढील काही दिवस देखील चंद्रपूर शहरात तापमानाचा उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरात उन्हाळ्यात सूर्य नेहमीच आग ओकत असतो. येथे आजवर 48 डिग्री तापमानाचीदेखील ( temperature of 48 degrees in Chandrapur ) नोंद झाली आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यापासून उन्हात प्रचंड वाढ ( huge increase of temperature ) होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच मार्च महिन्यापासूनच चंद्रपूरचा पारा चढला असल्याचे दिसून आले. 31 मार्च रोजी तब्बल 44 डिग्री इतक्या तापमानाची ( maximum temperature in Chandrapur ) नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे 50 वर्षांच्या इतिहासात आजवर इतक्या तापमानाची पहिल्यांदाच नोंद करण्यात आली. या दिवशी सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत चंद्रपूर सहाव्या क्रमांकावर होते. मात्र दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत.
एक एप्रिल रोजी चंद्रपूर शहराच्या तापमानात 43.6 डिग्रीची नोंद करण्यात आली आहे. त्यातही आज सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर अव्वल स्थानी आहे. या यादीत दहाव्या क्रमांकावर अकोला, अकराव्या अहमदनगर तर बाराव्या स्थानी ब्रम्हपुरी शहराची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूरकारांसाठी ही चिंतेची बाब आहे. कारण येत्या काही दिवसांत आणखी उष्णतेत वाढ होणार आहे. एप्रिलमध्ये आताच इतके तापमान वाढल्याने पुढील दिवस जिकरीचे असणार आहेत.
हेही वाचा-उद्धव ठाकरे बळजबरीने मुख्यमंत्री.. भाजपवर सूड उगविण्यासाठी शिवसेनेला हवंय गृहखातं : सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा-Congress Criticizes Bjp : भाजपाची कृती म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; काँग्रेसची टीका