ETV Bharat / state

..अन ठाणेदार झाले डोंग्यावर स्वार; तेलंगाणा सीमेवरील नदीपात्रात गस्त

author img

By

Published : Apr 10, 2020, 7:16 PM IST

संचारबंदीसाठी पोलिसांची धावाधाव होत असतांना तेलंगाणातून होणारी अवैध दारू तस्करी, नागरिकांची ये जा रोखण्यासाठी लाठी पोलीस स्टेशनचा ठाणेदारानी चक्क डोग्यावर स्वार होवून गस्त केली.

Chandrapur police patrolling
तेलंगणा सीमेवरील नदीपात्रात गस्त

चंद्रपूर - कोरोनाचा दहशतीने जग हादरले आहे. दुसरीकडे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. संचारबंदीसाठी पोलिसांची धावाधाव होत असतांना तेलंगाणातून होणारी अवैध दारू तस्करी, नागरिकांची ये जा रोखण्यासाठी लाठी पोलीस स्टेशनचा ठाणेदारानी चक्क डोंग्यावर स्वार होवून गस्त केली.

वर्धा नदीचा खोल पात्रातून डोग्याने प्रवास करीत तस्करांना हाकलून लावले जात आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर देश टाळेबंद झाला आहे. जिल्हाच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदी तोडणाऱ्यावर पोलीस कार्यवाही करीत आहेत. मात्र या परिस्थितीतही गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीचा विविध घाटातून चोर मार्गाने नागरिक तेलंगाणा गाठीत आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बऱ्याच गावांना लागून तेलंगाणाची सीमा आहे. या गावांना लागून असलेल्या वर्धा नदीचा घाटावरून चोरीछुपे प्रवास करीत आहेत. तर या मार्गाने अवैध दारू येत असल्याची चर्चा आहे. याची माहीती लाठी उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड मिळताच त्यांनी थेट नदीपात्रात नाव टाकली. नावेवर बसून त्यांनी गस्त केली. ठाणेदाराने थेट डोंग्याने प्रवास करीत गस्त लावल्याने घाटावरुन चोरी छुपे तेलंगाणात जाणारे धास्तावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.