ETV Bharat / state

Chandrapur Murder Case : दारुड्या पतीला पत्नी आणि मुलीनं संपवलं; नगीनाबाग परिसरातील घटना - Murder On Vijayadashami

Chandrapur Murder Case : चंद्रपूरात विजयादशमीला चंद्रपुरातील नगीनाबाग मध्ये पत्नीने आणि मुलीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस (Murder On Vijayadashami) आली. याप्रकरणात रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police Station)3 आरोपीना अटक केली आहे.

Chandrapur Murder Case
पतीला पत्नी आणि मुलीने संपवले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 8:28 PM IST

चंद्रपूर Chandrapur Murder Case : चंद्रपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. (Murder On Vijayadashami) दारुड्या पतीच्या छळाला त्रासून पत्नी आणि मुलीने पतीला संपवलं. ही घटना नगीनाबाग परिसरात ही घटना घडली आहे. निळकंठ चौधरी असं मृतकाचं नाव आहे. तर पत्नी, मुलगी आणि पत्नीचा भाऊ अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

निळकंठ चौधरीला जडले दारूचं व्यसन : निळकंठ चौधरी हा मजुरीचे काम करायचा आणि नगीनाबाग परिसरात आपली पत्नी मंगला चौधरी आणि मुलगी शिल्पा हिच्यासोबत किरायाच्या खोलीत राहायचा. त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. यात तो आपल्या पत्नीला बेदम मारायचा. यात पत्नीचा हात देखील मोडला होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. आज सकाळी पत्नी मंगला चौधरी हिला भेटण्यासाठी तिचा भाऊ विलास लटारु शेंडे हा सुशी दाबगाव येथून आला होता. घरी आल्यावर नीळकंठ चौधरी याने विलासला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

चंद्रपूरातील नगीनाबाग परिसरात राहणारे निळकंठ चौधरी हे मजुरीचे काम करायचे.त्याना दारूचं व्यसन जडले होते. यात ते आपल्या पत्नीला बेदम मारायचे. पत्नी मंगला चौधरी हिला भेटण्यासाठी तिचा भाऊ विलास लटारु शेंडे आले होते. यावेळी विलास आणि निळकंठ यांच्यात वाद झाला. तर मुलगी शिल्पा हिने लोखंडी रॉडने तर पत्नी मंगला हिने बांबूने नीळकंठ याच्या डोक्यावर वार केला.या मारहाणीत निळकंठ यांचा मृत्यू झाला. - स्वप्नील गोपाले, पोलीस उपनिरीक्षक

मारहाणीत निळकंठचा मृत्यू : पत्नी आणि मुलगी यांनीही हाणामारी केली. मुलगी शिल्पा हिने लोखंडी रॉडने तर पत्नी मंगला हिने बांबूने नीळकंठ याच्या डोक्यावर वार केला. याची नेहमीची कटकट आहे एकदाचे संपवून टाका याला असं म्हणत त्याला तिघांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत निळकंठचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिकांनी रामनगर पोलिस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तिन्ही आरोपीविरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.

हेही वाचा -

  1. Husband Murder Case Nashik : पतीला गाढ झोपेत असताना पत्नीने मुलासोबत मिळून धाडले यमसदनी; हत्येचे 'हे' धक्कादायक कारण
  2. Man Killed Wife Daughter : थरारक! पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या, पती कॅमेऱ्यासमोर म्हणाला...
  3. Nagpur Crime : लेकीने घडवला बापाचा खून, बापाचे 'ते' प्रकरण लेकीच्या डोक्यात गेलं मग थेट दिली हत्येची सुपारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.