ETV Bharat / state

चंद्रपूर महापालिका : मास्क न वापरता विनाकारण फिरणाऱ्या 386 नागरिकांवर कारवाई, 78 हजारांचा दंड वसूल - कोरोना व्हायरस

चंद्रपूर महानगरपालिकेकडून विनाकारण मास्क न वापरता फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात मोहिम उघडली आहे. गेल्या पाच दिवसात केलेल्या कारवाईत महानगरपालिकेच्या पथकांनी ३८६ लोकांवर कारवाई केली असून ७८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ नागरिकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

Chandrapur Municipal Corporation: Action against 386 citizens without masks
मास्क न वापरता विनाकारण फिरणाऱ्या 386 नागरिकांवर कारवाई
author img

By

Published : Apr 28, 2020, 11:45 AM IST

चंद्रपूर - मास्क न वापरणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी ३८६ लोकांवर कारवाई केली असून ७८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ नागरिकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मागील पाच दिवसांत करण्यात आली.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणार्‍यांना व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी २३ तारखेपासून सुरू करण्यात आली.

गेल्या पाच दिवसात ३८६ नागरिकांवर कारवाई करून ७६,६०० रुपयांचा एकूण दंड पथकांनी वसूल केला आहे. झोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत १४० लोकांवर कारवाई करून २७,९००रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत १३१ लोकांवर कारवाई करून २६,२०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ११५ लोकांवर कारवाई करून २२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला ३ मास्कसुद्धा देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.