चंद्रपूर - यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे निश्चित झाले आहे. यानंतर त्यांनी दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा... 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'
चंद्रपुर विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी दिली जाते, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यामध्ये बाळू खोबरागडे, महेश मेंढे, प्रवीण पडवेकर, किशोर जोरगेवार यांची नावे चर्चेत होती. अखेर किशोर जोरगेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : महाराष्ट्रात सत्तांतर व शिवसेना-भाजप युतीची सत्ता.. राज्यात पहिल्यांदाच ब्राम्हण मुख्यमंत्री
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष नंदू नगरकर उपस्थित होते.