ETV Bharat / state

एकाच आठवड्यात चंद्रपुरात चार खून; संघटित गुन्हेगारीने डोके काढले वर - विजय वडेट्टीवार न्यूज

चंद्रपूरमध्ये एकाच आठवड्यात चार खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आदेश दिले आहेत.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Oct 3, 2020, 3:49 PM IST

Updated : Oct 3, 2020, 7:20 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी डोके वर काढत आहे. ते पाहता चंद्रपूर हे गुन्हेगारीच्या प्रमाणात उत्तर प्रदेश व बिहारच्या मार्गावर जाण्याची वेळ आली आहे. एका आठवड्यात चार खून झाले आहेत. त्यावर विचारले असता पाालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कायदा मोडणारा कितीही मोठा असली तरी त्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

कायद्याचा कुठलाही धाक मनात न ठेवता भर रस्त्यावर, भर दिवसा बेछूट निर्घृण खून होत आहेत. हत्या करण्यासाठी चाकू, सुरे, लोखंडी रॉड, बंदुकांचा बेछूट वापर केला जात आहे. यामुळे जिल्ह्यात हत्येचे एक सत्रच सुरू झाले अशी स्थिती निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची भयंकर परिस्थिती जिल्ह्यात कधीच नव्हती. मग पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके काय करीत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, की गुंडगिरीला ठोकून काढण्याचे आदेश देत आहोत. आठ-दहा गंभीर गुन्ह्यातील लोक आहेत. त्यांच्यावर महिनाभरात कारवाई होणार आहे. कोरोनाच्या काळात महारष्ट्रातच नव्हे तर देशात गुन्हेगारी वाढल्याचेही विजय विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जिल्ह्यात कोळसा तस्करी, दारूतस्करी, वाळूतस्करी आणि इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय मिळत आहे. यातूनच वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्या आहेत.

संघटित गुन्हेगारीने डोके काढले वर

असा होतो समाजावर विपरीत परिणाम
दिवसाढवळ्या खून होत असल्याने समाजात दहशत निर्माण होते. सामान्य माणसाचा कायद्यावरील विश्वास कमी होत जातो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळते. आपले कोणीच वाकडे करू शकत नाही अशी भावना वृद्धिंगत होते. त्यातून गुन्हेगारीचे जाळे पसरत जाते. गुन्हेगारी जगताच्या संपर्कात असणारे लोक पोलिसांचे मोठे शक्तीस्थळ असतात. हेच लोक गुन्हेगारी जगतात नेमके काय सुरू आहे, याची खडानखडा माहिती पुरवतात. मात्र, जेव्हा अशा प्रकारची बेछूट गुन्हेगारी सुरू होते. त्यावेळी या वर्गातही भीती निर्माण होते. जिवाच्या भीतीने ही माहिती पुरविली जात नाही. हे नेटवर्क उद्धवस्त होते.

पोलीस अधीक्षकांसमोर दारुतस्करीपेक्षा गुन्हेगारीचे आव्हान
जिल्ह्यात दारूबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात दारुतस्करी केली जाते. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल आहे. त्यामुळे यासाठी एक मोठे जाळे तयार झाले आहे. त्यात अनेकांना रस आहे. नुकतेच रुजू झाले पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दारुतस्करीवर कारवाईचे आव्हान हाती घेतले आहे. मात्र, त्यापेक्षाही संघटित गुन्हेगारी हा विषय अधिक गंभीर आहे. ते रुजू झाल्यापासून एकट्या चंद्रपूर शहरात चार खून झाले आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी साळवे यांच्यासमोर मोठे आहे.

थरकाप उडविणारी गंभीर गुन्ह्यांची सूची
1. 8 ऑगस्ट - बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ह्या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण आहे. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली. यातील काही आरोपी तर अवघ्या एकोणीस-वीस वर्षांचे आहे. हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर 'जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा' अशी पोस्ट टाकली होती.

2. 15 सप्टेंबर : माजरी येथे जागेच्या वादातून ग्रामपंचायत सदस्य अमित केवट आणि त्याच्या भावाने अजय यादव याचा चाकू आणि तलवारीने खून केला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अजय यादवने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या घरी घुसून महिला व मुलांना मारहाण केली होती. .

3. 24 सप्टेंबर : चोरीची माहिती दिली म्हणून सुटून आलेला आरोपी सरफराज उर्फ शूटर शेख आणि त्याच्या साथीदारांनी करण केवट याच्या घरात घुसून हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी मृत केवटच्या नातेवाईकांनी हत्या करणारा शूटरचा नातेवाईक सुल्तान उर्फ साजिद अली याला संपविले.

4. 27 सप्टेंबर : माजरी येथे मुलीचा शारीरिक छळ करतो म्हणून सासरा अमृतलाल केवट आणि त्याचा मुलगा विजय केवट यांनी आपला जावई संदीप साबळे याला आपल्याच गावात कुऱ्हाडीने मारून संपविले.

5. 30 सप्टेंबर : काँग्रेसमध्ये सक्रिय असणारा व्यावसायिक मनोज अधिकारी याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत कोसारा येथील फ्लॅटमध्ये आढळून आला. त्याला कुऱ्हाड आणि इतर शस्त्रांनी वार करून संपविण्यात आले. या प्रकरणात आरोपी म्हणून अपक्ष नगरसेवक अजय सरकार व रवींद्रनाथ बैरागी यांना अटक केली. तर सीमा दाभाडे आणि धनंजय देबनाथ हे फरार आहेत. हा खून राजकीय वैमनस्यातून आहे की इतर कारण आहे, हे अद्याप समोर आले नाही.

6. 1 ऑक्टोबर : तुकुम परिसरातील दहा वर्षीय बालक वेदांत पाटील याला आईस्क्रीमचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला दुचाकीवर बसवून लोहारा येथील पुलावर नेऊन नीलिमा शेंडे नामक ही महिला त्याच्यावर चाकूने हल्ला करून संपवित होती. मुलाने आरडाओरडा केला. यावेळी चीचपल्लीकडे जाणारे दोन व्यक्तीमुळे मुलाचा जीव वाचला होता.

Last Updated : Oct 3, 2020, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.