ETV Bharat / state

Ashram School Chandrapur आश्रम शाळेला अनुदान देतो म्हणून आयुक्त मोहिते यांनी 15 लाख घेतले, आत्महत्या प्रयत्न करणाऱ्याचा धक्कादायक आरोप

Ashram School Chandrapur चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यालयात लातूरच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. लक्ष्मण पवार असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

author img

By

Published : Aug 21, 2022, 12:37 PM IST

Ashram School Chandrapur
Ashram School Chandrapur

चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यालयात शुक्रवारी 19 ऑगस्टला लातूरच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. लक्ष्मण पवार असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, लक्ष्मण पवार यांनी घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आश्रमशाळेला अनुदान मिळवून देण्याचं अमिश दाखवून मनपा आयुक्त मोहिते यांनी आपल्याकडून 15 लाख रुपये घेतले. त्यावेळी ते तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही मोहिते यांनी पैसे परत केले नाही. Chandrapur Municipal Corporation त्यामुळे मला आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला असा धक्कादायक आरोप लक्ष्मण पवार यांनी Chandrapur Crime ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी राहणारे लक्ष्मण पवार यांनी शुक्रवारी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यालयात जाऊन स्वतःवर चाकूचा हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षारक्षक धावून आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यात जखमी झालेले लक्ष्मण पवार यांच्यावर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Municipal Corporation तसेच त्यांच्याजवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले गेले आहे. त्यामुळे पवार यांना कुणालाही भेटण्यास, बोलण्यास मनाई आहे. त्यांना सुट्टी होताच लगेच त्यांना पोलीस अटक करणार आहेत. मात्र या दरम्यान ईटीव्ही भारतने त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

आश्रमशाळेच्या अनुदानाच्या नावाने घेतले 15 लाख 2016 मध्ये राजेश मोहिते हे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहाय्यक होते. यावेळी एका व्यक्तीच्या ओळखीने लक्ष्मण पवार आणि त्यांच्या वडिलांनी मोहिते यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला अनुदान देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार यासाठी 14 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार पवार यांनी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी 10 लाख खर्च केले. यादरम्यान पवार आणि त्यांच्या वडिलांनी मोहिते यांना आधी 10 लाख 70 हजार आणि नंतर 4 लाख रुपये अशी 2 टप्प्यात रक्कम दिली, असे पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

दबावापुढे 3 लाखांचा पर्याय रक्कम मिळाल्यावर मोहिते यांनी आठ ते दहा दिवसांत आश्रमशाळेला मान्यता मिळेल असे सांगितले. मात्र यानंतर आज या उद्या या, आता अधिवेशन सुरू आहे, अशी टाळाटाळ सुरू झाली. यानंतर मोहिते यांची नागपूर मनपा उपायुक्तपदी बदली झाली. त्यामुळे आता आपले काम होणार नाही, याची शाश्वती पवार यांना झाली. त्यानुसार त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. यावेळी मोहिते 70 हजार परत देण्यात आले. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पवार सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांनी चंद्रपूर मनपासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रयत्नही केला. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता. मात्र प्रशासकीय दबावापुढे त्यांचे काही जमले नाही. यानंतर पवार यांनी लातूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथल्या पोलिसांनी तक्रार घेऊन पवार यांच्यावर ही तक्रार मागे घेण्यास दबाव आणला. यादरम्यान मोहिते आणि पवार यांच्यात 2 मे 2022 ला कागदोपत्री करार झाला. या तडजोडपत्रावर आता यापुढे आपण राजेश मोहिते यांना कुठलाही मानसिक त्रास देणार नाही आणि आपली तक्रार आपण मागे घेत असल्याचे हमीपत्र द्यावे लागले. यादरम्यान मोहिते यांनी 3 लाख परत केले असल्याचे पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

नोकरी आणि दिव्यांग मुलाच्या उपचाराचे आश्वासन पवार यांच्या म्हणण्यानुसार हे तडजोडपत्र लिहून देताना आयुक्त राजेश मोहिते यांनी लक्ष्मण पवार यांना एका खासगी कंपनीत सेवक म्हणून कायमस्वरूपी नोकरी आणि पवार यांच्या दिव्यांग मुलाच्या ऑपरेशनचा सर्व खर्च उचलण्याची हमी दिली होती. मात्र, यानंतर मोहिते यांनी कुठलाही प्रतिसाद देणे बंद केले. पवार यांना 12 वर्षांचा दिव्यांग मुलगा आहे. त्याच्या मेंदूत सुरळीत रक्तपुरवठा होत नसून त्यावर महागडी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. 2020 मध्ये लक्ष्मण पवार यांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. घरी चार मुले, पत्नी असा संसार आहे. कुटुंबात ओढवलेले आर्थिक संकट आणि मुलाला वाचविण्यासाठी ऑपरेशनची गरज या विवंचनेत असताना मोहिते यांच्या टाळाटाळीमुळे अखेर मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे पवार म्हणाले.

साक्षीदारांवर दबाव मोहिते आणि पवार यांच्या तडजोडीबाबत जो करारनामा झाला, त्यात शिवशंकर विश्वनाथ पाटील आणि अजयसिंग हरिसिंग राठोड यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. आत्महत्येचे प्रकरण घडल्यामुळे या साक्षीदारांवर प्रचंड दबाव येत आहे. त्यांना पोलिसांसह वेगवेगळ्या व्यक्तींचा फोन येत असून त्यातून दबाव आणण्यात येत आहे. याबाबत अजयसिंग राठोड या व्यक्तीशी संपर्क केला असता शिवशंकर पाटील यांच्या म्हणण्यानुसार मी फक्त स्वाक्षरी केली. मात्र बाकी मला यातले काहीही माहिती नाही असे स्पष्ट केले. मोहिते यांनी किती पैसे परत केले आणि किती करणार आहेत. याबाबत आपल्यासमोर कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

मोहिते यांचा फोन बंद याबाबत आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे दिसून आले. त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी 2 मे 2020 रोजी झालेल्या तडजोडपत्राची प्रत पाठवून हे स्वयंस्पष्ट असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांना मानसिक त्रास देणारा वादाचा विषय नेमका कोणता होता. ज्यामुळे तडजोड करण्याची वेळ आली यावर त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

हेही वाचा Wife Beat BJP leader महिला नेत्याबरोबर एकत्रित पाहिल्यानंतर भाजप नेत्याला पत्नीकडून चपलेने जोरदार मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.