चंद्रपूर- जिल्ह्यात मंगळवारी १९ कोरोना रुग्णांची वाढ झालीय. चंद्रपूरमध्ये वाढलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या ४४७ झाली आहे. २८६ बाधित बरे झाले असून १६१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी आढळलेल्या १९ बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील नागरिकांचा अधिक समावेश आहे. यामध्ये श्वसनाच्या गंभीर आजारातून पॉझिटिव्ह ठरलेल्या नागरिकाचा समावेश आहे. रामनगर परिसरातील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय नाकोडा चंद्रपूर येथील ३५ वर्षाच्या पुरुषाचा संपर्कातून स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे. श्वसनाच्या गंभीर आजार असलेली बल्लारपूर येथील ४८ वर्षीय महिला तपासणीअंती पॉझिटिव्ह आली आहे. चंद्रपूर शहरातील गिरणार चौक येथील पोलिस कॉर्टर मधील २५ वर्षीय महिला व २३ वर्षीय पोलीस संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
राजुरा येथील ५१ वर्षीय आणखी एक पोलीस जवान पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे. काल राजुरा येथूनच ५१ वर्षीय पोलीस जवान पॉझिटिव्ह आला होता.चंद्रपूर शहरातील राजीव गांधी नगर शामनगर या परिसरातील संपर्कातून २२ वर्षीय युवक बाधित ठरला आहे. जगन्नाथ बाबा मंदिर परिसरातील ६ वर्षीय मुलगा व ६ वर्षीय मुलगी ही देखील संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. तुकूम परिसरातील ५५ वर्षीय नागरिक संपर्कातून पॉझिटिव्ह ठरलेला आहे. गिरणार चौक चंद्रपूर येथील श्वसनाच्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर शहरातील चोर खिडकी परिसरातील अनुक्रमे ७७, २३, २२ व २० वर्षीय चार महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. चिमूर तालुक्यातील महावाडी गावातील यापूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील केवडा या गावाचा १९ वर्षीय युवक हा देखील संपर्कातून पॉझिटीव्ह आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बोधा येथील २२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. एका महिलेला नागपूरला हलविण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात मंगळवारी ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ९१ हजार ४४० वर पोहोचली आहे. दिवसभरात १० हजार ३३३ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण बरे झाल्याने दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १४४६९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.