ETV Bharat / state

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे कोरोना नियंत्रण कक्षात 'सेलिब्रेशन'; लग्नाचा वाढदिवस केला साजरा - कोरोना नियंत्रण कक्षात 'सेलिब्रेशन

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोरोना नियंत्रण कक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला. वाढदिवसात तमाम आरोग्य अधिकारी सहभागी झाले. हे सर्व वाढदिवसाचे फोटो सध्या समाज माध्यमांवर वायरल झाले आहेत.

celebration-in-district-health-officer
कोरोना नियंत्रण कक्षात 'सेलिब्रेशन
author img

By

Published : Jun 8, 2020, 9:19 PM IST

चंद्रपूर - ज्या अधिकाऱ्यावर कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे, त्याच अधिकाऱ्याने नियमांना तिलांजली दिल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तोही चक्क कोरोना नियंत्रण कक्षात.

एकीकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केली जात असताना खुद्द जबाबदार अधिकारी याचे उल्लंघन करीत असल्याचे समोर येताच यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोरोना नियंत्रण कक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला.

कोरोना काळात शारीरिक अंतर पाळा- तोंडाला मास्क लावा- आवश्यक तेवढेच सण उत्सव कार्यक्रम साजरे करा अशा पद्धतीच्या रोजचा सूचनांचा रतीब याच कार्यालयातून जारी होतो. मात्र या सर्व सूचना केवळ नागरिकांसाठीच आहे अधिकाऱ्यांसाठी नाही. असा समज झालेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चक्क नियंत्रण कक्षातच डॉक्टर गहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. केक कापून-केक भरवून आणि आनंदात साजरा करत गहलोत यांच्या लग्नाच्या वाढदिवसात तमाम आरोग्य अधिकारी सहभागी झाले. हे सर्व वाढदिवसाचे फोटो सध्या समाज माध्यमांवर वायरल झाले आहेत.

कोरोना नियंत्रण कक्षात 'सेलिब्रेशन

नियंत्रण कक्षात साजरा केलेल्या वाढदिवसाने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाची मात्र नाचक्की झाली आहे. या वायरल फोटो बाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गेहलोत यांनी लग्नाचा वाढदिवस नियंत्रण कक्षात साजरा झाला याला दुजोरा दिला. कुटुंब दूर आहे, आम्ही सतत तणावात आहोत, विरंगुळा म्हणून सेलिब्रेशन केले अशी माहीती दिली. सेलिब्रेशन आधी सर्वांना सॅनिटाईज केले गेले अशी खबरदारीयुक्त उष्टीही त्यांनी जोडली. मात्र, मग हा नियम सर्वांनाच लागू होतो का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यावर आता जिल्हा प्रशासन के कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.