ETV Bharat / state

काँग्रेस उमेदवारांच्या निवड समितीत इच्छुक उमेदवारांचाच भरणा, आयटकने घेतला आक्षेप - इंटक

काँग्रेस उमेदवारांच्या निवड समितीत इच्छुक उमेदवारांचाच भरणा सर्वाधिक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराच्या निवड प्रक्रियेला हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे ह्या निवड समितीवर निर्भर न राहता ही प्रक्रिया राज्यातील नवनियुक्त कार्याध्यक्षांकडे सोपविण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या आयटक संघटनेने केली आहे.

निवड समिती
author img

By

Published : Aug 4, 2019, 9:48 AM IST

चंद्रपूर - योग्य उमेदवाराला उमेदवारीची संधी मिळण्यासाठी काँग्रेसने राज्यात सर्वत्र निवड समिती तयार केली. मात्र, या समितीत इच्छुक उमेदवारांचाच भरणा सर्वाधिक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी मिळण्याच्या या प्रयत्नाला हरताळ फासला गेला आहे. या निवड समितीवर निर्भर न राहता ही प्रक्रिया राज्यातील नवनियुक्त कार्याध्यक्ष यांच्याकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आयटक संघटनेने केली आहे.

संघटनेने केलेल्या मागणीविषयी बोलताना इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे

येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जुन्याच निवड समित्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या समितीत 90 टक्के सदस्य यावेळेसच्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या निवड समितीमध्ये सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, आसावरी देवतळे, देवराव भांडेकर, सुनिता लोढीया, महेश मेंढे, सतीश वारजूकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण यावेळच्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे, ही निवड प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे.

राज्यातही सर्वत्र अशाच प्रकारचे चित्र आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्याची संधी आता लुप्त झाली आहे. ही निवड प्रक्रिया काँग्रेस पक्षासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे या निवड समितीवर निर्भर न राहता राज्यात नियुक्त केलेले कार्याध्यक्ष यांच्याकडे प्रत्येकी पाच ते सहा जिल्ह्यांचा कार्यभार देऊन काँग्रेस उमेदवारांची निवड करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा निवड समितीचे सदस्य तसेच इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आले आहे.

Intro:चंद्रपुर : योग्य उमेदवाराला उमेदवारीची संधी मिळण्यासाठी काँग्रेसने राज्यात सर्वत्र निवड समिती तयार करण्यात आली. मात्र या समितीत इच्छुक उमेदवारांचाच भरणा सर्वाधिक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी मिळण्याच्या या प्रयत्नाला हरताळ फासला गेला आहे. ह्या निवडसमितीवर निर्भर न राहता ही प्रक्रिया राज्यातील नवनियुक्त कार्याध्यक्ष यांच्याकडे सोपविण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या आयटक संघटनेने केली आहे.

Body:येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जुन्याच निवड समित्या कायम ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या समितीत 90 टक्के सदस्य यावेळेस च्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या निवड समितीमध्ये सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, आसावरी देवतळे, देवराव भांडेकर, सुनिता लोढीया, महेश मेंढे, सतीश वारजूकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण यावेळच्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे ही निवड प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. राज्यातही सर्वत्र अशाच प्रकारचे चित्र आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्याची संधी आता लुप्त झाली आहे. ही निवड प्रक्रिया काँग्रेस पक्षासाठी अत्यंत घातक असून या निवड समितीवर निर्भर न राहता राज्यात नियुक्त केलेले कार्याध्यक्ष यांच्याकडे प्रत्येकी पाच ते सहा जिल्ह्यांचा कार्यभार देऊन काँग्रेस उमेदवारांची निवड करण्यात यावी अशी मागणी जिल्हा निवड समितीचे सदस्य तसेच इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.